समलिंगी साथीदाराकडून 'इस्रो'च्या शास्त्रज्ञाची हत्या

वृत्तसंस्था
Saturday, 5 October 2019

केरळचे असलेले सुरेश यांचा हैदराबादच्या मध्यवस्तीत अमीरपेठ येथील अन्नपूर्णा अपार्टमेंटमध्ये प्लॅट आहे. तेथे ते एकटेच राहत होते. मंगळवारी ते घरात मृतावस्थेत आढळले.

हैदराबाद : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) 'नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर' (एनआरएससी) संबंधित शास्त्रज्ञ एस. सुरेश (वय 56) यांच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. त्यांच्या समलिंगी साथीदाराने पैशाच्या वादातून सुरेश यांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. 

सुरेश हे मंगळवारी (ता. 1) त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले होते. अज्ञात व्यक्तीने त्यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर तपासात त्यांच्या समलिंगी साथीदाराने पैशाच्या वादातून हत्या केल्याचे समोर आले आहे. तो लॅब टेक्‍निशिअन असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Vidhan Sabha 2019 : विखे-पाटलांचा अर्ज धोक्यात?

केरळचे असलेले सुरेश यांचा हैदराबादच्या मध्यवस्तीत अमीरपेठ येथील अन्नपूर्णा अपार्टमेंटमध्ये प्लॅट आहे. तेथे ते एकटेच राहत होते. मंगळवारी ते घरात मृतावस्थेत आढळले. कोणीतरी घरात घुसून अथवा सुरेश यांना ओळखणाऱ्या व्यक्तीने त्यांची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना होता. अखेर पोलिसांनी त्यांच्या समलिंगी साथीदारास ताब्यात घेतल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. 

INDvsSA : पोरं कसोटी खेळतात की वनडे? आफ्रिकेला 384 धावांची गरज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Money Dispute over Sexual Relations with Male Lab Technician Led to ISRO Scientist Murder