Vidhan Sabha 2019 : विखे-पाटलांचा अर्ज धोक्यात?

वृत्तसंस्था
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

- भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज.

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी काल (शुक्रवार) अर्ज दाखल केले. त्यामध्ये मंत्री आणि भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, आता त्यांचा उमेदवारी अर्ज धोक्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे. त्यामध्ये विखे-पाटील यांचा उमेदवारी अर्ज धोक्यात येण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काल (शुक्रवार) उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच त्यांनी अर्जामध्ये स्वतःसह अन्य प्रतिनिधींचे 3 असे एकूण 4 उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, विखे-पाटील यांनी ज्या वकिलाकडून प्रतिज्ञापत्र तयार केले. त्या वकिलाला प्रतिज्ञापत्र करण्याचा अधिकारच नाही, असा दावा विरोधकांनी केला. त्यामुळे आता राधाकृष्ण विखे-पाटील यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्री फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध

काँग्रेसचा आक्षेप

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना नोटरी करून दिलेल्या प्रमाणपत्रावरच काँग्रेसने आक्षेप घेतला. ज्या वकिलाकडे हे प्रमाणपत्र बनवण्यात आले. त्यांचा नोटरी करण्याचा परवाना 2016 मध्येच संपला असल्याचा दावा विरोधकांनी केला.

जवान चंदू चव्हाण यांचा लष्कराचा राजीनामा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Radhakrishna Vikhe Patil Nomination Form may Difficult to Pass Maharashtra Vidhan Sabha 2019