सेक्सुअल पार्टनरची संख्या कमी करा, Monkeypox च्या पार्श्वभूमीवर WHO चा सल्ला

भारतासह जगभरात मंकीपॉक्सची प्रकरणे वाढताना दिसत आहेत.
WHO chief
WHO chiefesakal
Updated on

भारतासह जगभरात मंकीपॉक्सची प्रकरणे वाढताना दिसत आहेत. देशात आत्तापर्यंत मंकीपॉक्सची तीन प्रकरणे समोर आली आहेत. मंकीपॉक्सचा वाढता प्रभाव पाहता जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केले आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी लैंगिक संबंध ठेवण्यावर मर्यादा ठेवा असा गंभीर सल्ला दिला आहे.(Monkeypox WHO chief advises at-risk men to reduce number of sexual partners)

WHO chief
मंकीपॉक्स जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित; WHOची तातडीची बैठक

ज्या पुरुषांना मंकीपॉक्सचा धोका आहे त्यांनी काही काळासाठी लैंगिक साथीदारांची संख्या मर्यादित ठेवण्याचा विचार करावा. लैंगिक भागीदारांची संख्या कमी करा, नवीन भागीदारांसोबत लैंगिक संबंधांवर पुनर्विचार करा. असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे की, ७० हून अधिक देशांत मंकिपॉक्सचा वाढता प्रसार पाहता ही जागतिक आपातकालिन स्थिती आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस यांनी बैठकीत सदस्यांमध्ये एकमत झालेले नसतानाही आणीबाणीची घोषणा केली आहे.

WHO chief
Monkeypox : भारतात मंकीपॉक्सचा आलेख वाढता, केरळमध्ये तिसऱ्या रुग्णाची नोंद

तीन मार्गांनी पसरतो व्हायरस…

हा व्हायरस तीन मार्गांनी पसरतो. पहिला म्हणजे प्राण्यांकडून माणसांकडे संक्रमण होते. संक्रमित प्राण्याच्या संपर्कात मनुष्य आल्यास त्याता या विषाणूची बाधा होते. दुसरी मार्ग म्हणजे व्यक्तीचा स्कीन टू स्कीन टच. संक्रमित रुग्णाचे कपडे, भांडे किंवा बेडशीटच्या माध्यमातून हा विषाणू पसरतो. तिसरे म्हणजे शरीरसंबंधांच्या माध्यमातून… असुरक्षित शरीरसंबंधांमुळेही विषाणू पसरतोय. अमेरिकेसहित अनेक देशांमध्ये समलैंगिक पुरुषांच्या केसेस जास्त समोर येत आहेत. या आजाराचे विषाणू हवेतून पसरत नाहीत. असे आरोग्य नीती आणि महामारी तज्ज्ञ डॉ. अंशुमन कुमार यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com