

यंदा मॉन्सून लवकर येईल अशी चर्चा रंगली असतानाच, तो वेळेपेक्षा थोडा उशिरा दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज गुरुवारी जाहीर केले की, मॉन्सूनने केरळात औपचारिक प्रवेश केला आहे. केरळमध्ये आगमन झाल्यानंतर मॉन्सूनने कर्नाटकातही हजेरी लावली आहे. दोन ते तीन दिवसात महाराष्ट्र दाखल होण्याची शक्यता आहे.