पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 17 खासदारांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 14 September 2020

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पावसाळी अधिवेशनाला उशीराने सुरुवात झाली. अधिवेशनात सहभागी होण्यापूर्वी खासदारांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. ज्या खासदारांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले त्यांनाच सभागृहात प्रवेश देण्यात आला.

भाजप खासदार  मीनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडे, परवेश  साहिब सिंह यांच्यासह 17 खासदारांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी  17 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या सदस्यांमध्ये भाजपचे सर्वाधिक खासदार असून  काँग्रेस (वाय आरएस), शिवसेना, डीएमके, या पक्षांच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश असल्याचे समजते. 

बॉलिवूड ड्रग्जप्रकरणाचे लोकसभेत पडसाद, भाजप खासदाराकडून पाक-चीनवरही आरोप

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पावसाळी अधिवेशनाला उशीराने सुरुवात झाली. अधिवेशनात सहभागी होण्यापूर्वी खासदारांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. ज्या खासदारांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले त्यांनाच सभागृहात प्रवेश देण्यात आला.  पावसाळी अधिवेशनाच्या सत्रातील पहिल्या दिवशी लोकसभा सदस्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियमाचे पालन करत कामकाजाला सुरुवात केली.  सुरक्षिततेसाठी सदस्यांच्या जागेच्या पुढे प्लॅस्टिक शील्ड कव्हर लावण्यात आले होते. सदस्यांना त्यांच्या जागेपर्यंत पोहचवण्यासाठी लोकसभेतील कर्मचारी मदत करतानाही पाहायला मिळाले.  

NEET Exam: 700 किमी प्रवास केला पण 10 मिनिटं उशीर झाल्यानं वर्ष गेलं वाया

लोकसेभेत जवळपास 200 सदस्य उपस्थितीत होते. तसेच 50 सदस्यांनी गॅलरीत बसल्याचे पाहायला मिळाले.लोकसभेच्या सभागृहात मोठा स्क्रीन लावण्यात आला असून राज्य सभेच्या चेंबर्समध्ये बसलेले सदस्य स्क्रिनच्या माध्यमातून दिसत होते. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या उद्देशाने सदस्यांना राज्यसभा चेंबर, लोकसभा चेंबर आणि प्रेक्षक गॅलरीमध्ये आसन व्यवस्था करण्यात आली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monsoon Session 17 MPs including Meenakshi Lekhi Anant Kumar Hegde test positive for COVID 19