Rain
sakal
संपूर्ण भारतवर्षासाठी वरदान असलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) अंदमानातील आगमनासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. आठवड्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच पुढील चार ते पाच दिवसांत मॉन्सून अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मॉन्सून अंदमानात धडकण्याचा सांगावा मिळताच, केरळातील आगमनाबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत.