

Monsoon Winds Strengthen maharashtra
esakal
IMD Weather Forecast Maharashtra : राज्यात मॉन्सूनची वाटचाल सुरू असताना पुढील तीन ते चार दिवसांत दक्षिण कोकण, गोवा आणि घाट परिसरातील काही भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार या काळात मुंबईत पावसाचे प्रमाण कमी-अधिक राहू शकते. मात्र, मुंबईत अपेक्षित पावसाची तीव्रता न आल्यास १४ जूनच्या आसपास पुन्हा पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.