Morarji Desai : भारताचे माजी पंतप्रधान करायचे स्वमूत्रप्राशन, खरंच शिवांबूने दीर्घायुषी होता येतं?

माजी पंतप्रधान मोरारजी देसाई ९९ वर्ष जगले. त्यांचा वाढदिवस ४ वर्षातून एकदा २९ फेब्रुवारीला येत.
Morarji Desai
Morarji Desai esakal

Morarji Desai Death Anniversary 2023 : भारताचे चौथे पंतप्रधान आणि काँग्रेस शिवाय इतर पक्षाचे असे पहिले पंतप्रधान असलेले मोरारजी देसाई यांच्या वाढदिवस ४ वर्षांतून एकदा येतो. त्यांचा जन्म २९ फेब्रुवारीला झाल्याने दरवर्षी येत नसे.

ते पहिले गुजराती पंतप्रधान होते. ते शिस्त आणि प्रामाणिकपणा याच्याशी कधीही तडजोड करत नव्हते. ते स्पष्ट वक्ते होते. त्यामुळे लोक त्यांना कडक व्यक्तीमत्वाचे समजत. याशिवाय त्याच्या अजून एका गोष्टीची कायम चर्चा असे, ते स्वमूत्र प्राशन करायचे. त्याला शिवांबू प्राशन म्हणतात.

मोरारजी देसाईंचा जन्म २९ फेब्रुवारी १८९६ ला झाला तर मृत्यू १० एप्रिल १९९५ ला वयाच्या ९९ व्या वर्षी झाला. ते वयाच्या ८१ व्या वर्षी पंतप्रधान झाले होते. नेहरूंच्या निधनानंतर त्यांनी अनेकदा पंतप्रधान होण्यासाठी प्रयत्न केले पण अयशस्वी ठरले.

नेहरूंनंतर तेच होते पंतप्रधान पदाचे दावेदार

मोरारजी फार सक्षम नेते होते. नेहरूंनंतर पंतप्रधान पदाचे ते सगळ्यात ताकदवान दावेदार होते. त्यानंतर लाल बहादुर शास्त्रींनंतरही असंच वाटलं होतं, की मोरारजी पंतप्रधान होतील. मार्च १९७७ मध्येही जेव्हा ते देशाचे पंतप्रधान बनले तेव्हाही चौधरी चरण सिंह यांच्याशी मतभेद झाल्याने एक वर्ष आणि थोडा अधिक काळ पद सांभाळून लगेच राजीनामा दिला.

Morarji Desai
Morarji Desai Punyatithi : गोध्रा दंगलीने आयुष्य बदललं आणि थेट बनले पंतप्रधान

स्वमूत्रपान करणे याला उत्तम औषध मानत

मोरारजी देसाई स्व-मूत्रपान करणे याला स्वास्थ्याच्या दृष्टीने उत्तम औषध मानत असे. शिवांबू अर्थात स्व-मूत्रपान करण्याविषयी त्यांनी जाहिरीत्या स्वीकारले होते. त्याचे फायदे पण सांगितले होते.

ते जेवणात थोडं दूध, मोसंबी, फळांच्या रसाशिवाय काही सुकामेवा खात असत. ते मुलाखतीत सांगायचे की, त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य स्व मूत्र प्राशन आहे. जे ते नियमित करतात.

Morarji Desai
PM Narendra Modi : 'मोदी हुशार माणूस, तुझ्यासारख्यांना...' अनुमप खेर यांच्या आईची पोस्ट चर्चेत

रात्री झोपमोड करणं आवडत नव्हतं

  • जेव्हा ते रात्री झोपायला जात तेव्हा त्यांना उठायला आवडत नसे. पंतप्रधान असतानाही त्यांचा हा नियम कायम होता.

  • त्यांना १०० वर्षे जगायचे होते. पण त्यांचा मृत्यू ९९ वर्ष पूर्ण आणि काही महिन्यांनी झाला.

  • ते एकमेव असे पंतप्रधान होते ज्यांना भारतरत्न आणि पाकिस्तान कडून तहरीक-ए-पाकिस्तान हा सर्वश्रेष्ठ नागरीक सन्मान मिळाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com