Morbi Bridge Accident : दारी तोरणं, मांडव, हाती मेहंदी सजली अन्...; अंगावर काटा येणारी कहाणी

"मी तिला वचन दिलं होतं की तू पूल बघून परत आल्यावर मी तुला चॉकलेट देईन. पण ते वचन पूर्ण होऊच शकलं नाही".
Morbi Bridge Accident
Morbi Bridge AccidentSakal

नूरजा मजोथी, १८ वर्षीय तरुणी, सोमवारी म्हणजे ३१ ऑक्टोबर रोजी तिचा साखरपुडा होता. घरात आनंदीआनंद होता, दारी तोरणं, मांडव सजले होते. साखरपुड्याचा तिचा ड्रेसही तयार होता, घरात नातेवाईकांची गजबज होती. पण तिच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस हा सगळ्यात दुःखाचा दिवस ठरेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.

मोरबीच्या जवळच कांतीपूर इथं राहणाऱ्या नूरजाच्या हातावर रविवारी म्हणजे ३० ऑक्टोबरला मेहंदी सजली होती. तिचा भाऊ जुमा, त्याची बायको रेश्माबेन आणि त्यांची दोन मुलं तिच्या घरातल्या आणखी तीन लहान मुलांसह दोघांसोबत मोरबीतला हा पूल बघायला गेले होते. पण घराबाहेर पडलेल्या या ९ जणांपैकी केवळ एकच जण संध्याकाळी घरी परतला.

Morbi Bridge Accident
Morbi Incident : मोदींचा फोटो चांगला यावा म्हणून मध्यरात्री सिव्हील हॉस्पिटलची रंगरंगोटी? विरोधक संतापले!

आपलं दुःख मांडताना नूरजा म्हणाली, "माझी भाची महिनूरने माझ्याकडे चॉकलेट मागितलं होतं. पण माझ्या हातावर मेहंदी काढली होती, त्यामुळे मी तिला म्हणाले की मी नंतर देईन. मी तिला तसं वचन दिलं होतं की तू पूल बघून परत आल्यावर मी तुला चॉकलेट देईन. पण ते वचन पूर्ण होऊच शकलं नाही." नूरजाचे वडील त्या मंगलकार्याच्या मंडपात त्या ८ मृतदेहांसोबत बसले होते. त्याच ठिकाणी पाहुणे मंडळी बसणार होती. या नऊ जणांपैकी फक्त एकच म्हणजे हलिमाबेन वाचू शकल्या. कारण उंचीची भीती वाटल्याने त्या पूलावर गेल्याच नाहीत.

Morbi Bridge Accident
Morbi Bridge : "डास मारण्याची रॅकेट बनवणाऱ्या कंपनीकडे होतं पुलाच्या देखभालीचं कॉन्ट्रॅक्ट?"

आता या परिवाराला न्यायाची अपेक्षा आहे. कितीही भरपाई दिलीत तरी आमच्या परिवाराचं झालेलं नुकसान भरून निघणार नाही, त्यामुळे आम्हाला न्याय हवा आहे, असंच या परिवाराचं म्हणणं आहे. नूरजाचे वडील साजन यांनी हे मृत्यू नसून खून असल्याचं म्हटलं आहे. तर जुमाचा आणखी एक भाऊ इब्राहिमने याविरोधात कायदेशीर लढाई लढून दोषींना शिक्षा देण्याचा निर्धार केला आहे. स्थानिक प्रशासन म्हणतंय की पूल पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांच्याकडून परवानगी घेतलेली नव्हती. मग त्यांना ही गोष्ट माहित नव्हती का? ते काय करत होते? पूल पडण्याआधी चार दिवसांपासून तो सुरू होता. मग तरीही पूल सुरू आहे ही गोष्ट त्यांना कशी कळली नाही, असे प्रश्न इब्राहिमने उपस्थित केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com