लशीसाठी आणखी कंपन्यांना मंजुरी द्यायला हवी : गडकरी

Nitin Gadkari
Nitin Gadkari
Updated on
Summary

गडकरी म्हणाले की, भारताला सध्या औषधांसाठी कच्चा माल परदेशातून आयात करावा लागतो. आम्हाला आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे.

नवी दिल्ली - देशात (India) कोरोना लसीकरणामध्ये (Corona Vaccination) लशीच्या तुटवड्यामुळे अडथळा येत आहे. यावर आता भारत बायोटेकनं (Bharat Biotech) लसीचा फॉर्म्युला इतर कंपन्यांना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadakari) यांनी मंगळवारी असं म्हटलं की, कोरोना प्रतिबंधक लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी आणखी काही औषध कंपन्यांना याच्या निर्मितीसाठी मंजुरी द्यायला हवी. विद्यापीठांच्या कुलपतींसाठी आयोजित कार्यक्रमात नितिन गडकरी बोलत होते. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) याबाबत विनंती करणार आहे की देशात जीवरक्षक औषधांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणखी काही औषध कंपन्यांना मंजुरी द्यावी. यासाठी कायदा तयार करण्यात यावा. या औषधांमध्ये पेटंट असलेल्या इतर कंपन्यांकडून दहा टक्के रॉयल्टीची व्यवस्थाही करण्यात यायला हवी. (more firm should get licences for vaccine says nitin gadkari)

Nitin Gadkari
प्लाझ्मानंतर रेमडेसिव्हिरच्या वापरावर बंदी?

लसीच्या पुरवठ्याच्या तुलनेत त्याची मागणी वाढली तर मोठा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे एका कंपनीऐवजी 10 कंपन्यांना लशीचं उत्पादन करण्यासाठी परवानगी द्यायला हवं. यासाठी लसीचं मूळ पेटंट असलेल्या कंपनीला इतर कंपन्यांकडून दहा टक्के रॉयल्टी द्यायला हवी अंसही गडकरी म्हणाले. याआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना याबाबत पत्र लिहून केंद्राने लस तयार करणाऱ्या दोन्ही कंपन्यांचा फॉर्म्युला इतर लस उत्पादक कंपन्यांना द्यायला हवा. यामुळे लशीचं उत्पादन वाढवता येईल असं केजरीवाल यांनी म्हटलं होतं.

गडकरी म्हणाले की, भारताला सध्या औषधांसाठी कच्चा माल परदेशातून आयात करावा लागतो. आम्हाला आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे. भारतातील सर्व जिल्हे हे मेडिकल ऑक्सिजनबाबतीत आत्मनिर्भर असायला हवेत. देशातील आरोग्य विभाग सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाच्या या साथींमध्ये सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आत्मविश्वास कायम ठेवायला हवा.

Nitin Gadkari
कोरोनाचा मोदींनाही फटका, 'शक्तिशाली नेता' प्रतिमेला धक्का

सध्या देशात कोरोना प्रतिबंधल लशीचं उत्पादन दोन कंपन्या करत आहेत. भारत बायोटेक कोव्हॅक्सिन तर सीरम इन्स्टिट्यूट कोविशील्ड लस तयार करते. अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं होतं की, 'या दोन्ही कंपन्यांना इतर कंपन्यांकडून लस उत्पादनातून होणाऱ्या फायद्यामधून रॉयल्टी देता येईल.' भारतात तीन लशींच्या वापराला मंजुरी मिळाली आहे. त्यामध्ये कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही लशीचा समावेश आहे. डॉक्टर रेड्डीज लॅब स्पुटनिक व्ही लस रशियातून आयात करत आहे. सध्या ही लस देशात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com