कुंभमेळ्यात 1 हजार ‘पॉझिटिव्ह’ ते भारताच्या 5 अ‍ॅथलीटना कोरोना

देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर.
हर माजला आहे. दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढताना दिसतोय.
हर माजला आहे. दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. प्रतिकात्मक छायाचित्र

देशात कोरोनाचा कहर माजला आहे. दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. त्यातच हरिद्वार येथे कुंभमेळा सुरु आहे. या कुंभमेळ्याला लाखो भाविकांनी उपस्थिती लावली आहे. कोरोनाकाळातही कोणतीही खबरदारी न घेता लाखो भाविक स्नानासाठी गंगा नदीच्या किनारी जमले होते. प्रचंड गर्दीमुळे येथे कोरोनारुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. बुधवारी समोर आलेल्या आकडेवारीने चिंता आणखी वाढवली आहे. गेल्या २४ तासांत देशात २ लाख ७३९ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. सर्वसामान्य प्रवाशांना ठराविक वेळेत 1 फेब्रुवारीपासून लोकल प्रवास करण्यास मुभा मिळाली होती. पण आता मुख्यमंत्र्यांनी १५ एप्रिलपासून पुढील १५ दिवस निर्बंध लागू केल्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या प्रवाशांनाच रेल्वे प्रवासाची परवानगी आहे. सर्वसामान्य प्रवाशांचा लोकल प्रवास बंदच झाला आहे. देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर.

हरिद्वार (उत्तराखंड) - जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव समजल्या जाणाऱ्या येथील कुंभमेळ्यात बुधवारी तिसरे शाही स्नान परंपरागत पद्धतीने उत्साहात साजरे झाले. कोरोनाकाळातही कोणतीही खबरदारी न घेता लाखो भाविक स्नानासाठी गंगा नदीच्या किनारी जमले होते. प्रचंड गर्दीमुळे येथे कोरोनारुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, गेल्या ४८ तासांत एक हजाराहून भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. वाचा सविस्तर

हेही वाचा-

हर माजला आहे. दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढताना दिसतोय.
भयंकर : एकाच दिवशी स्मशानभूमीत कोरोनाच्या तब्बल.. 27 मृतदेहांवर अंत्यसंस्कार

नवी दिल्ली - कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक ठरताना दिसत आहे. बुधवारी (ता.१४) दिवसभरात नोंदवली गेलेली आकडेवारी मनात धडकी भरवणारी ठरली आहे. मंगळवारी (ता.१३) आतापर्यंतची एका दिवसातील सर्वोच्च नोंद झाली होती. कोरोना आटोक्यात येईल की नाही, असा सर्वजण विचार करत असताना बुधवारी समोर आलेल्या आकडेवारीने चिंता आणखी वाढवली आहे. गेल्या २४ तासांत देशात २ लाख ७३९ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. वाचा सविस्तर

सोलापूर - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या माध्यमातून राज्याच्या महाविकास आघाडीची लोकप्रियता सिद्ध होणार आहे. हे सरकार अनैसर्गिक युती करुन सत्तेवर आल्याचा विरोधकांच्या आरोपावरदेखील निवडणुकीतून शिक्कामोर्तब होणार आहे. कदाचित या मतदारसंघातील जनतेच्या नाराजीतून राज्यातील राष्ट्रपती राजवटीच्या मागणीला बळकटी येईल, अशीही चर्चा आहे. वाचा सविस्तर

मुंबई - सर्वसामान्य प्रवाशांना ठराविक वेळेत 1 फेब्रुवारीपासून लोकल प्रवास करण्यास मुभा मिळाली होती. पण आता मुख्यमंत्र्यांनी १५ एप्रिलपासून पुढील १५ दिवस निर्बंध लागू केल्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या प्रवाशांनाच रेल्वे प्रवासाची परवानगी आहे. सर्वसामान्य प्रवाशांचा लोकल प्रवास बंदच झाला आहे. अशा परिस्थितीत लोकांकडील ओळखपत्र हाच त्यांच्या प्रवासाचा परवान असल्यामुळे अनेक ठिकाणी बनावट ओळखपत्र बनविणाऱ्यांचा पुन्हा सुळसुळाट वाढण्याची शक्यता आहे. गेल्या लॉकडाउनमध्ये हा प्रकार समोर आला होता. वाचा सविस्तर

पुणे - जिल्ह्यात बुधवारी (ता.१४) दिवसांतील नवीन कोरोना रुग्णांच्या प्रमाणात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढले. मागील सव्वा महिन्याच्या खंडानंतर आज पहिल्यांदाच हे घडले आहे. पुणेकरांना कोरोनाच्या बाबतीत दिलासा देणारी ही बातमी ठरली आहे. जिल्ह्यात आज ७ हजार ८८८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. वाचा सविस्तर

बंगळूर- टोकियो ऑलिंपिकची पात्रता मिळवलेल्या प्रियांका गोस्वामीसह भारताच्या पाच अ‍ॅथलीटसना कोरोनाची बाधा झाली आहे. या सर्वांचा मुक्काम तसेच सराव बंगळूरच्या भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात सरू आहे. प्रियांकाने नुकतीच २० किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत ऑलिंपिक पात्रता नोंदवली आहे. वाचा सविस्तर

पिंपरी - शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. गतवर्षी एप्रिली महिन्यात केवळ चार जण दगावले होते. यंदा मात्र एप्रिलमधील अवघ्या 14 दिवसांतच 342 दगावले आहेत. दररोजचे सरासरी प्रमाण 20 आहे. पिंपळे गुरव, चिखली, रावेत, चिंचवड, वाकड, भोसरी, पिंपरी येथील सर्वाधिक मृत्यू आहेत. बेशिस्तिमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. परिणाणी खाट मिळणे व त्यातल्या त्यात आयसीयू कक्षात उपचार मिळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. याच कारणामुळे कमी वयाचे रुग्ण देखील दगावत आहेत. वाचा सविस्तर

मुंबई - महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. पॉझिटिव्ह असूनही कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त असली, तरी अत्यवस्थ असलेल्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. कोरोनामुळे रुग्णाची स्थिती गंभीर झाल्यानंतर शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे रुग्णाच्या शरीराला कुत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागतो. सध्या महाराष्ट्राच्या वेगवेगळया भागात कोरोनाचे लाखो सक्रिय रुग्ण आहेत. वाचा सविस्तर

टोकियो - एक वर्ष लांबणीवर टाकण्यात आलेले टोकियो ऑलिंपिक १०० दिवसांवर आले आहे, पण स्पर्धेवरील कोरोनाचे ढग चिंताजनकच झाले आहेत. जपानवासीयांचा स्पर्धेस असलेला विरोध वाढतच आहे. त्यातच भारत आणि ब्राझीलमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे स्पर्धा किती सुरक्षित असेल याची चर्चा सुरू झाली आहे. जपानने ऑलिंपिकचे यजमानपद मिळवले, त्या वेळी आर्थिक प्रश्न नसतील तसेच राजकीय अस्थिरतेची चिंता नसेल. पण हीच स्पर्धा आता सर्वाधिक असुरक्षित मानली जाण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर

नाशिक - कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत 15 दिवसांची संचारबंदी लागू केली असली तरी कारखाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याने उद्योग-व्यवसायावरील आर्थिक संकट टळले आहे. नाशिकमधील सातपूर, अंबडसह सिन्नर, गोंदे, इगतपुरी, दिंडोरी भागातील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगार, कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचता येणार आहे. वाचा सविस्तर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com