Mosquito Terminator Train : आता IRCTC ने सुरू केली डासांसाठीही स्पेशल ट्रेन

डासांसाठी स्पेशल ट्रेन चालवल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? पण देशाच्या राजधानीत अशीच डासांसाठी खास स्पेशल ट्रेन चालवली जाते आहे.
Mosquito Terminator Train
Mosquito Terminator Train esakal

Viral Video : डास म्हणजे आजार पसरवण्यास कारक ठरतात. डासांमुळे डेंग्यू, चिकनगुनिया असे गंभीर आणि जीवघेणे आजार होतात. त्यामुळे डास आपल्या आसपास असावेत असं कुणालाच वाटत नाही. किंबहुना डासांच्या नायनाट करण्यासाठी प्रयत्न केले जातात. उपाय केले जातात. असं असताना डासांसाठी स्पेशल ट्रेन का बरं?

Mosquito Terminator Train
Viral Video : 'सामी सामी...' गाण्याची क्रेझ, चिमुकल्यांनाही लागलंय वेड

रेल्वे, ट्रेन म्हटलं की त्यात प्रवासी आणि मालवाहतूक होते. सणासुदीचा काळ असेल किंवा काही खास कार्यक्रम असेल तर स्पेशल ट्रेन चालवल्या जातात. पण कधी डासांसाठी स्पेशल ट्रेन चालवल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? पण देशाच्या राजधानीत अशीच डासांसाठी खास स्पेशल ट्रेन चालवली जाते आहे. मॉस्क्विटो टर्मिनेटर ट्रेनला नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.

Mosquito Terminator Train
Viral Video : पापाराझीवर रश्मिका मंदाना नाराज; म्हणाली, तुम्ही माझ्याशी का बोलत नाही?

डासांसाठी ट्रेन म्हणजे?

या ट्रेनमधून डासांची वाहतूक होणार नाही तर ही ट्रेन डासांचा खात्मा करणार आहे. पावसाळा म्हटला की डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका. घरात आपण डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणी, कॉईल, क्रिम, लिक्विड याचा वापर करतो. प्रशासनामार्फत जागोजागी फवारणी केली जाते. पण दिल्लीत या डासांचा खात्मा करण्यासाठी ही स्पेशल ट्रेन चालवली जाते.

Mosquito Terminator Train
Viral Video : रेल्वे प्रवाशांची चोराला अघोरी शिक्षा! लटकलेल्या अवस्थेत...

काय आहे उद्देश?

६ आठवडे एकूण १२ वेळा ही ट्रेन चालवली जाईल. दोनदा या ट्रेनमार्फत कीटकनाशकांची फवारणी केली जाईल. रेल्वे रूळ, त्याच्या आसपास डासांची पैदास होऊ नये, हे याचं उद्दिष्ट आहे.

अधिकाऱ्यांच्या मते, बऱ्याच ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर अस्वच्छ पाणी जमा होतं आणि तिथं डासांची पैदास होते. यामुळे डासांच्या अळ्याच नव्हे तर डासांचाही नायनाट होईल. रेल्वे रूळांजवळ झोपड्यांमध्ये राहणाऱ्यांसाठी हा दिलासा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com