गुजरातमधून धावल्या सर्वाधिक श्रमिक रेल्वे; महाराष्ट्र आहे 'या' क्रमांकावर

वृत्तसंस्था
Tuesday, 26 May 2020

देशात सर्वाधिक श्रमिक रेल्वे या गुजरातमधून धावल्या असून या यादीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.

नवी दिल्ली : देशात सर्वाधिक श्रमिक रेल्वे या गुजरातमधून धावल्या असून या यादीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.  १ मे पासून देशभरात ३०२६ श्रमिक रेल्वेगाड्या धावल्या असून यामधून आतापर्यंत ४० लाख स्थलांतरित मजुरांनी प्रवास केला आहे. गुजरातमधून ८५३ ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. गुजरातनंतर महाराष्ट्रातून ५५० रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गुजरात महाराष्ट्रानंतर पंजाब आणि उत्तर प्रदेश आणि त्यानंतर दिल्लीचा क्रमांक लागतो. पंजाबमधून ३३३, उत्तर प्रदेशातून २२१ तर दिल्लीमधून एकूण १८१ ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. ज्या राज्यांसाठी सर्वाधिक रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत त्यामध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. संपूर्ण देशातून उत्तरप्रदेशसाठी एकूण १२४५रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यानंतर बिहार दुसऱ्या क्रमांकावर बिहार असून बिहारसाठी एकूण ८४६ रेल्वेगाड्या सोडल्या आहेत. तर, झारखंडसाठी १२३ मध्य प्रदेशसाठी ११२ आणि ओडिशासाठी ७३ रेल्वेगाड्या सोडल्या आहेत.
----------
भाजपमध्ये धूसफूस; मागील महिन्याच्या राजकारणाचा पहिला बळी
----------
अभिमानास्पद ! युएनचा मिलिट्री जेंडर अ‍ॅडव्होकेट पुरस्कार मेजर सुमन गावनी यांना जाहीर
----------
राज्यांनी केलेल्या विनंतीच्या आधारे रेल्वे मंत्रालयकडून श्रमिक रेल्वेगाड्या पुरवल्या जात असून या रेल्वेगाड्यांसाठी येणारा ८५ टक्के खर्च रेल्वे उचलत असून उर्वरित खर्च राज्य सरकार उचलत आहेत. दरम्यान, १ मे रोजी पहिली श्रमिक रेल्वेगाडी चालवली तेव्हा फक्त चार रेल्वेगाड्या चालवण्यात आल्या ज्यामध्ये चार हजार प्रवासी होते. २० मे रोजी सर्वात जास्त २७९ ट्रेन चालवण्यात आल्या. त्यावेळी चार लाख लोकांनी प्रवास केला. १ मे पासून सुरु करण्यात आलेल्या विशेष ट्रेनमधून प्रवास केलेल्यांमध्ये ८० टक्के प्रवासी उत्तर प्रदेश आणि बिहारचे असल्याची माहिती रेल्वे बोर्डाकडून देण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Most Shramik trains from Gujarat, Maharashtra on second Number