उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने तिच्या १५ दिवसांच्या नवजात बाळाला फ्रीजरमध्ये ठेवले. जेव्हा बाळ फ्रीजरमध्ये रडू लागले तेव्हा कुटुंबाला याची माहिती मिळाली. ही धक्कादायक घटना मुरादाबाद जिल्ह्यातील करुला येथून घडली आहे. तिच्या नवजात बाळासोबत असे कृत्य करणारी महिला मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे सांगितले जात आहे.