

Indias Flying Car Innovation Motor Mechanics Son Builds Aircraft Like Vehicle Without Science Education At 200 Kmph
esakal
आकाशात उडणारी कार हे स्वप्न चित्रपटांपुरते मर्यादित राहू नये, यासाठी अल्मोडा जिल्ह्यातील रवि टम्टा यांनी प्रत्यक्ष प्रयोग सुरू केला आहे. विज्ञान किंवा अभियांत्रिकीची पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांतून ‘हपिडा स्काईनेक्स’ नावाची वन-सीटर इलेक्ट्रिक हेलीकार विकसित केली आहे. या प्रोटोटाइपची पहिली चाचणीही यशस्वी झाली असून कार सुमारे एक मिनिट हवेत राहण्यात यशस्वी ठरली.