MP Election: पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, पण ज्योतिरादित्य शिंदेंना दणका

jyotiraditya_scindia1
jyotiraditya_scindia1

भोपाळ (Madhya pradesh Election Result 2020)- मध्य प्रदेशातील 28 विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. भाजपने 19 जागा जिंकण्यात, तर काँग्रेसला 8 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे मध्य प्रदेशातील शिवराजसिंह सरकार सध्या तरी सुरक्षित आहे. भाजप सहजपणे बहुमताचा आकडा पार करेल, पण भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांना हा मोठा धक्का सिद्ध होणार आहे. कारण, भाजपचा ज्या जागांवर पराभव होत आहे, त्यातील अधिकांश जागा ग्लालियर-चंबल अंचल या शिंदे प्रभाव क्षेत्रातील जागा आहेत. 

शिंदेचा प्रभाव कमी होणार

10 महिन्यांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदेनी भाजपशी हात मिळवला होता. त्यांच्यासोबत 22 आमदारांनी राजीनामे दिले होते. यामुळे कमलनाथ सरकार पडले आणि राज्यात फेरनिवडणुकीची वेळी आली. शिंदेना राज्यसभेच्या खासदारकीची बक्षीस मिळाली. निवडणुकीदरम्यान शिंदे आणि शिवराज भाजपाचे स्टार प्रचारक होते. ग्वालियर-चंबल भागातील भाजप उमेदवारांची जबाबदारी शिंदे यांच्यावर होती. याठिकाणी अपेक्षेप्रमाणे रिझल्ड न आल्याने शिंदेचा पक्षामधील प्रभाव कमी होऊ शकतो. 

Bihar Result Live Update: आतापर्यंत 74 जागांचे निकाल जाहीर; भाजप-आरजेडीमध्ये...

शिंदेच्या भाजप प्रवेशामुळे शिवराजसिंह यांच्या कॅबिनेटमधील अनेक दिग्गज मंत्र्यांना बाहेर रहावे लागले होते. आता नव्या निकालामुळे शिवराज यांना आपल्या पसंतीचा कॅबिनेट निवडण्यात सूट मिळू शकते. हरलेल्या शिंदे समर्थक मंत्र्यांच्या जागी भाजपच्या जून्या नेत्यांना संधी मिळू शकते. 

केंद्रात शिंदेंना संधी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्योतिरादित्य शिंदे यांना कॅबिनेट मंत्री करतील अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. पोटनिवडणुकीच्या निकालामुळे यात काही बदल होईल, याची शक्यता कमी आहे. कारण, शिंदे यांना प्रदेशातून दूर ठेवणे भाजपच्या हिताचे आहे. यामुळे शिवराज सिंह यांचा राज्यातील विरोध कमी होईल आणि त्यांना बिनविरोध कामकाज चालवता येईल. यामुळे स्थानिक नेत्यांनाही थोडं हायसे वाटेल आणि शिंदेचे प्रभावक्षेत्र कमी होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com