डोळ्यासमोर स्वत:ला उद्ध्वस्त होताना पाहू शकत नव्हतो; मध्यप्रदेशच्या दाम्पत्याची कहाणी

mp police
mp police

भोपाळ - मध्य प्रदेशातील गुना इथं मंगळवारी झालेल्या दलित कुटुंबियाच्या मारहाण आणि आत्महत्या प्रकरणी सहा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित कऱण्यात आलं आहे. तसंच या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी सुरु कऱण्यात आली आहे. गुरुवारी भोपाळवरून आयजी आय पी अरजरिया आणि डिआयजी एके पांडे यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पीडित दाम्पत्याचा जबाब नोंदवून घेतला आणि घटनेचा आढावा घेतला. पीडीत राजकुमारने यावेळी पोलिसांसमोर त्याच्यावर ओढवलेल्या संकटाची कहाणी सांगितली. 

राजकुमार म्हणाला की, अधिकारी येताच त्यांनी पिकाची नासधूस करायला सुरुवात केली. आमच्या डोळ्यादेखत हे उद्ध्वस्त होताना पाहू शकत नव्हतो. दरम्यान, दाम्पत्याकडे किटकनाशक कुठून आलं याचा शोध घेत आहेत. दुसरीकडे आयजी अरजरिया यांनी सांगितलं की, या प्रकरणाची चौकशी केली जाईल. दाम्पत्याला मारहाण होण्यामागे ते दलित आहेत हे कारण आहे की इतर काही कारणं आहेत याचा शोध घेतला जाईल. 

पीडित राजकुमारने अधिकाऱ्यांना सांगितलं की, वाट्याने जमीन घेऊन शेती करायचं हेच आमचं काम. आम्हाला सांगितलं होतं की या जमिनीबाबत न्यायालयानं निर्णय दिला आहे आणि कोणताच वाद नाही. त्यामुळे पैसे खर्च करून सोयाबीन लावलं होतं. मंगळवारी अधिकारी आले आणि त्यांनी जमिनीची मोजणी करण्याबद्दल सांगितलं. त्यानंतर अचानक उभ्या पिकाची नासधूस केली. आमच्याच डोळ्यांसमोर स्वत: उद्ध्वस्त होताना पाहू शकत नव्हतो. 

राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या प्रकऱणाची चौकशी करण्यासाठी पक्षाकडून समिती स्थापन केली आहे. यामध्ये माजी मंत्री बाला बच्चन, प्रभारी प्रदेशाध्यक्ष रामनिवास रावत आणि सुरेंद्र चौधरी, माजी मंत्री जयवर्धन सिंग, माजी आमदार फूल सिंग बरैया, आमदारा हीरालाल यांच्यासह माजी महापौर विभा पटेल यांचा समावेश आहे. घटनास्थळी जाऊन ही समिती याची चौकशी कऱणार आहे. याचा रिपोर्ट कमलनाथ यांच्याकडे सोपवला जाणार आहे. पीडीत कुटुंबाला काँग्रेसकडून दीड लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांनी सांगितलं की, गुना प्रकरणी काँग्रेस चुकीची माहिती पसरवत आहे. यातून ते त्यांच्या पापांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करत असून सामाजिक वातावरण बिघडवत असल्याचाही आरोप केला. या प्रकरणी शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिग्विजय सिंग यांच्या भूमिकेची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या घटनेवरून सरकारला घेरलं आहे. राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत म्हणाले की आमची लढाई याच विचार आणि अन्यायाविरुद्ध आहे. दुसरीकडे बसपा अध्यक्षा मायावती म्हणाल्या की, पिकाची नासधूस केल्यानंतर दाम्पत्याला आत्महत्येसाठी दबाव टाकणं शरमेची बाब आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com