High Court News: मुलगा चांगल्या कुटुंबातील, मुलीचा विनयभंग करणाऱ्याला उच्च न्यायालयाने केला 'या' एका अटीवर जामीन मंजूर

Madhya Pradesh High Court News: न्यायालयाने आरोपी विद्यार्थ्याला भोपाळ जिल्हा रुग्णालयात दर शनिवार आणि रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत फक्त डॉक्टर आणि कंपाउंडर्सना मदत करण्याची शिक्षा दिली आहे.
High Court News
High Court NewsEsakal

अल्पवयीन मुलीला अश्लील कॉल आणि व्हॉट्सॲपद्वारे सतत त्रास देणाऱ्या आरोपीला न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. त्या बदल्यात न्यायालयाने आरोपीला शिक्षा म्हणून समाजसेवा करण्यास सांगण्यात आले आहे. आरोपी चांगल्या कुटुंबातील असल्याचेही न्यायालयाकडून यावेळी नमूद करण्यात आले आहे. न्यायालयाचे म्हणणे आहे की, या प्रकरणात लावलेले आरोप अत्यंत वाईट आहेत, परंतु आरोपीला त्याचे वर्तन सुधारण्याची संधी दिली पाहिजे.

रुग्णालयात काम करण्याची दिली शिक्षा

न्यायमूर्ती आनंद पाठक या खटल्याची सुनावणी करत होते. 16 मे रोजी त्यांनी आदेश जारी केला होता. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, न्यायालयाने आरोपी विद्यार्थ्याला भोपाळ जिल्हा रुग्णालयात दर शनिवार आणि रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत फक्त डॉक्टर आणि कंपाउंडर्सना मदत करण्यास सांगितले आहे. मात्र, त्यासाठी काही अटीही ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये रुग्णाला औषधे, इंजेक्शन आदी न देणे, त्याला खासगी वॉर्डात जाऊ न देणे आदी बाबींचा यामध्ये समावेश आहे.

High Court News
Bomb Threat: बेंगळुरुमधील नामांकित 3 हॉटेल्स हाय अलर्टवर; बॉम्बने उडवून देण्याची मिळाली धमकी

काय म्हणाला आरोपी?

जामीन अर्जात आरोपीने म्हटले आहे की, बराच काळ त्याला ठोठडीत ठेवल्याने त्याच्या शिक्षणावर परिणाम होईल. आरोपीच्या वकिलाने कोर्टात सांगितले की, 'तो भविष्यात अशा कोणत्याही कृतीत सहभागी होणार नाही आणि एक चांगला नागरिक होण्यासाठी तो त्याची वर्तणुक सुधारेल.

रिपोर्टनुसार, आरोपीच्या पालकांनीही कोर्टात सांगितले आहे की, त्यांना त्यांच्या मुलाच्या या कृत्याची लाज वाटत आहे. आपला मुलगा भविष्यात असे कोणतेही कृत्य करणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. आरोपीच्या वकिलानेही कोर्टाला जामीन देण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, 'तो सर्जनशील आणि सामुदायिक कामांमध्ये सहभागी होऊ शकतो, ज्यामुळे त्याचा कथित अहंकार कमी होईल आणि नंतर त्याचे आचरण पाहून जामीन निश्चित केला जाऊ शकतो.'

High Court News
PM Modi Temple: असे मंदिर जिथे सकाळ-संध्याकाळ होते पंतप्रधान मोदींची पूजा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकार

न्यायालयाने काय म्हटले?

अहवालानुसार, न्यायालयाने म्हटले, 'असे दिसते की अर्जदार हा विद्यार्थी आहे आणि त्यामुळे त्याला त्याचे आचरण सुधारण्याची संधी दिली जाते. जेणेकरून तो कोणत्याही गुन्हेगारी कृत्यांमध्ये आणि विशेषत: IPC च्या कलम 354 (D) आणि POCSO कायद्याच्या कलम 11 आणि 12 मध्ये न अडकता एक चांगला नागरिक बनू शकेल. तर दुसरीकडे फिर्यादी पक्षाने आरोपीच्या जामिनाला विरोध करत पीडितेला सतत त्रास दिल्याचे म्हटले होते.

४ एप्रिल रोजी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. त्याच्यावर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मुलीचा छळ करणे, पाठलाग करणे आणि अश्लील कॉल करण्याचा आरोप आहे.

High Court News
Viral video: काय सांगता! आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची जीप थेट हॉस्पिटलमध्ये; काय होता त्याचा गुन्हा?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com