Loksabha Members : दोघा शेजाऱ्यांची संसदेत १०० टक्के हजेरी ; मोहन मंडावी आणि भगीरथ चौधरी यांचा संसदेतील कामकाजात पूर्ण सहभाग

भाजपचे खासदार मोहन मंडावी आणि भगीरथ चौधरी यांनी १७ लोकसभेच्या एकाही सत्राला एकही दिवस अनुपस्थित न राहता, सभागृहाच्या एकूण २७४ दिवस चाललेल्या कामकाजात पूर्ण सहभाग नोंदविला असल्याने या खासदारांचे विशेष कौतुक केले जात आहे.
loksabha
loksabhasakal

नवी दिल्ली : भाजपचे खासदार मोहन मंडावी आणि भगीरथ चौधरी यांनी १७ लोकसभेच्या एकाही सत्राला एकही दिवस अनुपस्थित न राहता, सभागृहाच्या एकूण २७४ दिवस चाललेल्या कामकाजात पूर्ण सहभाग नोंदविला असल्याने या खासदारांचे विशेष कौतुक केले जात आहे. विशेष म्हणजे या खासदारांची आसन व्यवस्थाही एकमेकांशेजारीच होती.

छत्तीसगडमधील कांकेर या आदिवासीबहुल मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे मोहन मंडावी म्हणाले, ‘‘मी फक्त मला देण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे.मी कोरोनाकाळातही संसदेच्या कामकाजात प्रत्यक्ष सहभागी झालो होतो आणि सर्व सत्रांना हजर होतो.’’ पीआरएस लेजिसलेटीव्ह या संस्थेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार भाजपचे मध्य राजस्थानातील अजमेरचे खासदार भगीरथ चौधरी यांचीही उपस्थिती शंभर टक्के होती.

loksabha
Rajya Sabha Election 2024 : जया बच्चन यांना पुन्हा उमेदवारी ; समाजवादी पक्षाने राज्यसभेच्या तीन उमेदवारांची नावे केली जाहीर

उत्तर प्रदेशातील हमीरपूरचे खासदार पुष्पेंद्रसिंह चंदेल हे १७ व्या लोकसभेतील सर्वात सक्रिय खासदार असून त्यांनी तब्बल एक हजार १९४ चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला आहे. त्याखालोखाल काँग्रेसचे आंदमान निकोबारचे खासदार कुलदीपराय शर्मा ८३३ चर्चासत्रांत भाग घेतला असल्याचे या अहवालात म्हटले आहे. एखादे विधेयक मांडल्यानंतर त्यावर करण्यात आलेली चर्चा, शून्य प्रहरात उपस्थित करण्यात आलेले मुद्दे व अन्य चर्चांमध्ये घेतलेल्या समावेशावरून ‘पीआरएस लेजिसलेटीव्ह’कडून याबाबत अहवालात नोंद करण्यात येते. बहुजन समाज पक्षाचे खासदार मलूक नागर यांनी ५८२ तर द्रमुकच्या डी. एन. व्ही. सेंथीलकुमार यांनी ३०७ चर्चासत्रांत सहभाग घेतला आहे.

या खासदारांचा सहभाग नाही

तृणमूल काँग्रेसचे नेते व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि भाजपचे खासदार व अभिनेते सनी देओल यांनी संसदेच्या एकाही सत्रातील एकाही चर्चासत्रांत सहभाग घेतला नसल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. याशिवाय आणखी सात खासदारांनीही संसदेतील चर्चांत एकदाही सहभाग घेतलेला नाही. यात भाजपचे रमेश जिगाजिनगी, बी एन बच्चेगौडा, प्रधान बरुआ, अनंतकुमार हेगडे व व्ही. श्रीनिवास प्रसाद या खासदारांचा समावेश आहे तर, तृणमूलचे दिव्येंदू अधिकारी व बहुजन समाज पक्षाचे खासदार अतुल कुमार सिंह यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com