MRF Tyres : मुलांसाठी फुगे ते देशातील नंबर वन टायर उत्पादक

ही कंपनी एकेकाळी मद्रास रबर फॅक्टरी म्हणून ओळखली जात होती.
MRF Tyres
MRF TyresSakal

नवी दिल्ली : MRF टायर्सचे नाव तुम्ही ऐकले असेलच. एकेकाळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) या कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर होता आणि प्रत्येक सामन्यात तो MRF ची बॅट (MRF Bat) घेऊन मैदानात जाताना दिसत होता. आज विराट कोहली (Virat KOhali) त्याचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. MRF ही एक भारतीय बहुराष्ट्रीय टायर निर्मिती कंपनी आहे, जी एकेकाळी मद्रास रबर फॅक्टरी म्हणून ओळखली जात होती. कंपनी टायर, ट्रेड्स, ट्यूब, कन्व्हेयर बेल्ट, पेंट्स, खेळणी, तसेच क्रीडासाहित्य आणि मोटर स्पोर्ट्सच्या निर्मितीमध्ये देखील आहे. एवढेच नाही तर एमआरएफ पेस फाउंडेशन आणि एमआरएफ इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हर डेव्हलपमेंटदेखील चालवते. एवढा मोठा व्यवसाय असलेल्या एमआरएफने मुलांसाठी फुगे बनवण्याच्या व्यावसायापासून सुरुवात केली होती. ( Journey OF MRF Tyres )

MRF Tyres
राज्यातील १४ जिल्हे निर्बंधमुक्त; रेस्तरॉं, सिनेमागृह १०० टक्के क्षमतेनं होणार सुरु

असा आहे MRF चा थक्क करणारा प्रवास

MRF ची सुरुवात 1940 च्या दशकात रबर बलून कारखाना म्हणून 14000 रुपयांच्या निधीतून झाली. हा बलून कारखाना 1946 मध्ये मद्रासच्या तिरुवोट्टीयुर येथील शेडमध्ये केएम मम्मन मॅपिलाई यांनी सुरू केला होता. 1949 पर्यंत, कंपनीने लेटेक्स कास्ट खेळणी, हातमोजे आणि गर्भनिरोधक बनवण्यास सुरुवात केली. त्याच बरोबर मद्रासच्या थंबू चेट्टी स्ट्रीटवर त्याचे पहिले कार्यालय सुरू केले. (Madras Rubber Factory)

MRF Tyres
Video : यु्क्रेनवर बोलताना बायडेन यांचा गोंधळ; कमला हॅरिस यांनी हळूच सांगितले

1952 मध्ये सुरू झाले रबर उत्पादनाचा व्यापार

1952 मध्ये या कारखान्यात ट्रेड रबरचे उत्पादन सुरू झाले आणि येथूनच त्याचा गौरवशाली इतिहासही लिहिला गेला. 4 वर्षांच्या आत म्हणजे 1956 पर्यंत, MRF 50% मार्केट शेअरसह भारतातील ट्रेड रबर मार्केटचा राजा बनला होता. मद्रास रबर फॅक्टरी लिमिटेड हे नाव नोव्हेंबर 1960 मध्ये अस्तित्वात आले. 1961 मध्ये, MRF सार्वजनिक कंपनी बनली. यासोबतच कंपनीने मॅन्सफिल्ड टायर आणि अमेरिकेच्या रबर कंपनीसोबत तांत्रिक सहकार्यही स्थापन केले.

1960 च्या दशकात निर्यातील सुरूवात

1964 मध्ये, MRF ने बेरूत येथे आपले कार्यालय उघडले, जे परदेशात टायर निर्यात करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल होते. याच वर्षी 'MRF Muscleman' अस्तित्वात आले. 1967 मध्ये, FRF ही US ला टायर निर्यात करणारी पहिली भारतीय कंपनी बनली, ज्याला टायर तंत्रज्ञानाचा जनक म्हणून ओळखले जाते. यानंतर, 1970 मध्ये, कंपनीने कोट्टायममध्ये आपला दुसरा प्लांट उघडला. कंपनीचा तिसरा प्लांट 1971 मध्ये गोव्यात आणि चौथा प्लांट 1972 मध्ये अरक्कोनम येथे सुरू झाला.

MRF Tyres
केंद्राच्या PMMVY योजनेचा विस्तार; दुसरे मुलं झाले तरी मिळणार लाभ

1973 मध्ये, MRF ने नायलॉन पॅसेंजर कार टायर्सची उत्पादन आणि विक्री सुरू केली. 1978 मध्ये, कंपनीने हेवी ड्युटी ट्रकसाठी MRF Superlug-78 टायरची निर्मिती केली. त्यानंतरच्या वर्षांमध्ये, उत्पादन देशात सर्वाधिक विक्री होणारे ट्रक टायर बनले. मॅन्सफिल्ड टायर अँड रबर कंपनीने 1979 मध्ये MRF मधील आपला हिस्सा विकला आणि नंतर एका वर्षाच्या आत कंपनीचे नाव MRF असे करण्यात आले. 1985 मध्ये कंपनीने दुचाकी वाहनांसाठी निलोग्रिप टायर लाँच केले.

काही महत्त्वाची वर्षे

  • 1988: MRF पेश फाउंडेशनच्या स्थापनेसह क्रीडा क्षेत्रात प्रवेश.

  • 1989: जगातील सर्वात मोठी खेळणी कंपनी हॅस्ब्रो इंटरनॅशनल यूएसए सोबत सहकार्य केले आणि फनस्कूल इंडिया लाँच केले. त्याच वर्षी, कंपनीने पॉलीयुरेथेन पेंट फॉर्म्युलेशन तयार करण्यासाठी व्हेपोक्युअर ऑस्ट्रेलियाशी करार केला. तसेच MUSCLEFLEX कन्व्हेयर आणि लिफ्ट बेल्टिंगसाठी पिरेलीशी हातमिळवणी केली.

  • 1993: केएम मैम्मेन मॅपिल्लई यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले दक्षिण भारतीय उद्योगपती ठरले.

  • 1996: MRF ने पुद्दुचेरीमध्ये रेडियल्सच्या उत्पादनासाठी पूर्णपणे समर्पित एक विशेष कारखाना सुरू केला. 1997 मध्ये, कंपनीने प्रथम F3 कारमध्ये प्रवेश केला. त्याच वर्षी, कंपनीचे पहिले टायर्स आणि सर्व्हिस फ्रँचायझी स्टोअर देशात उघडले.

  • 2007: कंपनीने 1 बिलियन डॉलर टर्नओव्हरचा टप्पा ओलांडला. त्याच वर्षी, कंपनीने पहिले इको-फ्रेंडली टायर्स लाँच केले. 2011 मध्ये, कंपनीचा 7 वा प्लांट अंकनपल्ली येथे सुरू झाला आणि कंपनीने 2 अब्ज डॉलर्सची उलाढाल केली. कंपनीचा 8वा प्लांट यावर्षी त्रिची येथे सुरू झाला. 9वा प्लांट 2012 मध्ये त्रिचीमध्येच सुरू झाला.

  • 2013: सुखोई 30 MKI फायटर जेटसाठी MRF चे एरोची निवड झाली.

  • 2015: MRF ला Forbes India च्या सुपर 50 भारतातील सर्वोत्तम कंपन्यांच्या यादीत पहिले स्थान मिळाले आहे. कंपनीने 2017 मध्ये या यादीतही चांगली रँकिंग मिळवली होती.

MRF Tyres
LIC चा आयपीओ लांबणीवर पडण्याची शक्यता; अर्थमंत्र्यांनी दिले संकेत

आज काय स्थिती

आज BSE मध्ये एमआरएफच्या एका शेअरची किंमत 485.75 रुपये इतकी आहे. कंपनीचे मार्केट कॅप रु. 28,077.02 कोटी आहे. 2021 मध्ये कंपनीची विक्री 15921.35 कोटी रुपये होती, तर एकूण उत्पन्न 16128.58 कोटी रुपये होते. डिसेंबर 2021 च्या तिमाहीत एमआरएफचे स्वतंत्र निव्वळ उत्पन्न ४८९८.८४ कोटी रुपये होते. MRF ने मारुती 800 साठी टायर देखील पुरवले आहेत. आज एमआरएफ दुचाकी, ट्रक, बस, कार, ट्रॅक्टर, हलकी व्यावसायिक वाहने, विमानाचे टायरचे उत्पादन करते. एवढेच नव्हे तर, एमआरएफच्या नावावर अनेक पुरस्कारही असून, कंपनीने 13 वेळा जेडी पॉवर अवॉर्ड जिंकला आहे. देशातील सर्वात विश्वसनीय टायर कंपनी म्हणून TNS आणि CAPEXIL पुरस्कार देखील जिंकले आहेत. MRF ही भारतातील सर्वात मोठी टायर उत्पादक कंपनी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com