MSEDCL Strike : शरद पवारांच्या आग्रहामुळेच गौतम अदानी वीजनिर्मितीमध्ये आले

आपत्कालिन परिस्थितीत वीज गेल्यास सबंध राज्य अंधारात जाण्याची भीती
MSEDCL Strike
MSEDCL Strike esakal

MSEDCL Strike : गेल्या काही दिवसांपासून अदानी पॉवर कंपनीला वीजवितरणाची परवानगी देण्याचे घाटत असून या विरोधात MSEB अभियंते तसेच कर्मचाऱ्यांनी आवाज उठवला आहे. मात्र, राज्य सरकारने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारच्या मध्यरात्रीपासून तीन दिवसांच्या (ता. ६ पर्यंत) संपाचे हत्यार उसपले आहे.

MSEDCL Strike
Kolambi Rice Recipe : झणझणीत कोळंबी भात कसा तयार करायचा?

आपत्कालिन परिस्थितीत वीज गेल्यास सबंध राज्य अंधारात जाण्याची भीती आहे. राज्य सरकारने अदानीला ही परवानगी दिल्यास सामान्य ग्राहक तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची वीज मिळणार नाही अशी भीतीही हे अधिकारी कर्मचारी व्यक्त करत आहेत. या संपात राज्यातील  लाखों कर्मचारी सहभागी होत आहेत.

MSEDCL Strike
Food Recipe : फक्त गुजरात्यांची मोनोपॉली नाही तर घरच्या घरी बनवा खमंग चटपटीत ढोकळा

महाराष्ट्राच्या वीजसंकटाचे व्हिलन गौतम अदानी ठरत आहेत. सध्याचे विरोधक महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार अदानी यांना विशेष मदत करत असल्याचे आरोप करत असतात. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी आल्यापासून अदानी यांची वाढलेली संपत्तीसुद्धा टीकेचा विषय आहे. मात्र त्यांच्या राजकीय हितसंबंधबद्दल चर्चा करताना हे देखील लक्षात येते की अदानी यांना वीजनिर्मिती क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली होती. पवारांनी आपल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात याचा उल्लेख केला आहे.शरद पवार सांगतात गौतम अदानी या तरुण उद्योजकाला मी अनेक वर्षांपासून ओळखतो आहे.

MSEDCL Strike
Farali Misal Recipe: शुक्रवार उपवासानिमित्त बनवा खास फराळी मिसळ

कमालीचा कष्टाळू आणि साधा ! शून्यातून त्यानं आपलं आजचं साम्राज्य उभं केलं आहे. लोकलमध्ये काही छोट्या वस्तूंची विक्री करण्यापासून या माणसाच्या उद्योजकतेला सुरुवात झाली. यानंतर काही छोटे व्यवसाय सुरू करून गौतम यांनी काही पैसे गाठीला बांधले. मग तो हिऱ्यांच्या व्यवसायात पडला. तिथेही पैसे मिळत होते, पण गौतम यांना त्याच्यात रस पायाभूत उभारणीच्या उद्योगात पडण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. यामधल्या काळात त्यांनी बंदर उभारणीचा पुष्कळ अभ्यास केला.

MSEDCL Strike
Heart And Covid-19 : कोरोना व्हॅक्सिन अन् हार्ट अटॅकचा काय संबंध? वाचा काय सांगतात रिपोर्ट्स

गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेलांचे आणि त्यांचे चांगले संबंध होते. त्यांनी चिमणभाईकडे गुजरातमधलं मुंद्रा बंदर विकसित प्रस्ताव ठेवला. मुंद्रा वाळवंटी भागातलं बंदर आहे. तिथून पाकिस्तानची सीमारेषा नजीक आहे. या वस्तुस्थितीची जाणीव चिमणभाईनी गौतम यांना दिली. गौतम यांनी प्रतिकूल परिस्थितीतही हे शिवधनुष्य पेललं. आज पन्नास हजार एकर जमिनीवरचं हे बंदर देशातलं सर्वात मोठं आणि अद्ययावत बंदर आहे.

MSEDCL Strike
Heart Care : फिटनेस प्रेमींनो सावधान! प्री वर्कआऊट सप्लीमेंट ठरू शकतात हार्ट अ‍ॅटॅकच कारणं

गौतम नंतर कोळसा पुरवण्याच्या व्यवसायातही आले. शरद पवार आपल्या चरित्रात सांगतात,  मी गौतमना सुचवलं, 'वीज प्रकल्पांसाठी कोळसा पुरवण्याबरोबर ऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रातही तुम्हीच उतरा' 

MSEDCL Strike
Kashid Beach : एका रोमांचक अशा शांत ठिकाणी फिरायला जायची इच्छा आहे? या ठिकाणी प्लॅन करू शकता

एकदा प्रफुल्ल पटेल यांच्या वडलांच्या स्मृतिदिनानिमित्त गोंदिया इथे गौतम आणि शरद पवार एकत्र आले होते. त्या वेळी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी, भंडारा जिल्ह्यात उद्योजकांनी गुंतवणूक करण्यासाठी शरद पवार यांनी मदत करावी, अशी भावना व्यक्त केली. यावर शरद पवार म्हणाले, "उद्योग येतील, पण तुम्हालाही सहकार्य करावं लागेल. आज गौतम अदानी आले आहेत. त्यांनी मी विनंती करतो, की ऊर्जानिर्मितीसाठी या परिसरात त्यांनी प्रकल्प उभा करावा. 

MSEDCL Strike
Winter Recipe: टेस्टी अन हेल्दी अननसाचा शिरा कसा तयार करायचा?

गौतमनीही त्यांच्या भाषणात त्यांच्या विनंतीला विधायक प्रतिसाद दिला. सर्वसाधारणपणे व्यासपीठांवरच्या वक्तव्यांतून फार काही घडतंच असं नाही. पण गौतमनी हा विषय लावून धरला. त्यांनी भंडाऱ्यात ऊर्जानिर्मिती प्रकल्प मार्गी लावला. गौतम यांनी ऊर्जानिर्मिताच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली. आज जवळपास बारा हजार मेगावॅट वीजनिर्मितीने त्याचे प्रकल्प उभारणीच्या प्रक्रियेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com