Food Recipe : फक्त गुजरात्यांची मोनोपॉली नाही तर घरच्या घरी बनवा खमंग चटपटीत ढोकळा

ढोकळा हा असा एकमेव पदार्थ आहे ज्याला कधीच कोणताच व्यक्ती नाही म्हणत नाही
Food Recipe
Food Recipe esakal

Food Recipe : गुजराती खाद्यपदार्थांमध्ये सर्वात मानाचं स्थान कोणाला ? तर ढोकळ्याला. कारण ढोकळा हा असा एकमेव पदार्थ आहे ज्याला कधीच कोणताच व्यक्ती नाही म्हणत नाही. ही एक पारंपारिक आणि अतिशय लोकप्रिय अशी गुजराती डिश आहे. मिठाईच्या दुकानात तर हमखास हा आंबट गोड ढोकळा विकायला ठेवलेला असतो.

Food Recipe
Heart And Covid-19 : कोरोना व्हॅक्सिन अन् हार्ट अटॅकचा काय संबंध? वाचा काय सांगतात रिपोर्ट्स

मात्र, दररोज खरेदी करून खाणं शक्य होत नाही. अशा परिस्थितीत तुम्हालाही ढोकळा आवडत असेल, पण तो कसा बनवायचा हे माहित नसेल, तर अगदी सोप्या पद्धतीने ढोकळा कसा बनवायचा याची रेसिपी वाचा. अगदी झटपट बनणारा हा पदार्थ नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. कोणत्याही पार्टी-फंक्शनसाठी ढोकळा बाहेरून मागवण्याऐवजी, तुम्ही ही सोपी रेसिपी काही मिनिटांत घरच्या घरी तयार करू शकता.

Food Recipe
Career Break : कामातून ब्रेक घेणं करिअरसाठी ठरतय फायदेशीर; कसं ते वाचा...

ढोकळा बनवण्याचे साहित्य-

१ वाटी बेसन

१ वाटी रवा

१ वाटी दही

१/२ चमचा हळद-

१/४ चमचा लाल तिखट

१ हिरवी मिरची

१/२ इंच आलं

१ इनो

टिनचं भांड

१ टी स्पून तेल

७ ते ८ कढीपत्याची पानं

मोहरी

पाणी - आवश्यकतेनुसार

मीठ - चवीनुसार

Food Recipe
Diabetes Patients : हिवाळ्यात डायबिटीस रूग्णांची इम्यूनिटी वाढवणारे 4 उपाय

ढोकळा बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम एक मोठा बाउल घ्या. त्यात बेसन, रवा, दही आणि पाणी घालून चांगले मिक्स करावे. ते कमीतकमी 5-7 मिनिटे फेटा. 15 मिनिटांनंतर त्यात हळद, हिरवी मिरची, ठेचलेले आले, मीठ, १ चमचा तेल घाला. आणखी एक मिनिट फेटून घ्या. आता त्यात इनोचं एक पाऊच टाकून मिक्स करा. यामुळे ढोकळा मऊ आणि स्पंजी होईल. चौकोनी आकाराचा डबा घ्या. त्याला बाजूने चांगले तेल लावा आणि फेटलेले बॅटर त्यात ओता. कढईत थोडे पाणी टाकून गॅसवर ठेवा. त्यात एक वाडगा ठेवावा, म्हणजे ढोकळा असलेला डबा त्यावर सहज ठेवता येईल.

Food Recipe
Farali Misal Recipe : शुक्रवार उपवासानिमित्त बनवा खास फराळी मिसळ

वरून थोडी लाल तिखट भुरभुरा. हा डबा कढईत ठेवा आणि झाकून ठेवा आणि मंद आचेवर वाफ येऊ द्या. ढोकळ्याला फोडणी देण्यासाठी फोडणीच्या भांड्यात १ चमचा तेल घाला. मोहरी, कढीपत्ता आणि चिरलेली हिरवी मिरची घालून फोडणी तयार करा. आता ढोकळा चांगला वाफवला आहे की नाही हे टूथ पिकने तपासा. तो मऊ आणि स्पॉन्जी झाल्यावर कढईतून एका ताटात काढून घ्या. त्यावर फोडणी ओत. ढोकळ्याच्या आकारात सुरीने कापून ढोकळ्याचा आस्वाद घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com