Viral Video: नातीला शिकवण्यासाठी घर विकणाऱ्या आजोबांची गोष्ट; मदतीला आले हजारो हात

Auto_Driver_Desraj
Auto_Driver_Desraj

पुणे : एखाद्याचं जीवन बदलण्याची ताकद सोशल मीडियात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांमधून ते सिद्ध झालं आहे. बाबा का ढाबा हे त्याचं ताजं उदाहरण देता येईल. आणि आता पुन्हा एका बाबांची गोष्ट सोशल मीडियात व्हायरल झाली असून त्यांचंही जीवन बदलून गेलं आहे. ज्या वयात माणूस आराम करण्याचं, नातवंडांसोबत खेळण्याचं स्वप्न पाहत असतो, त्या वयात देशराज (वय 74) हे मुंबईत रिक्षा चालवत आहेत. आणि ही रिक्षाचं त्यांचं घर बनली आहे. कारण जे त्याचं हक्काचं घर होतं ते त्यांनी नातीला शिकवण्यासाठी विकून टाकलं. 

दोन्ही मुलांच्या मृत्यूनंतरही खंबीरपणे उभे राहिले देसराज
काही दिवसांपूर्वी ह्यूमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या एका मुलाखतीत देसराज म्हणाले की, कामासाठी घरातून बाहेर पडलेला एक मुलगा घरी परतलाच नाही. या धक्क्यातून सावरत होतो तोपर्यत दुसऱ्या मुलानं आत्महत्या केली. दोन्ही मुलांच्या जाण्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. दुसऱ्या मुलाच्या आत्महत्येनंतर त्याच्या पत्नीने घर परिवार सोडला. त्यामुळे मुलांची जबाबदारी देसराज यांनी स्वीकारली. 

शिक्षण सर्वात महत्त्वाचं 
देसराज यांनी त्यांच्या नातवंडांना शिक्षणाचं महत्त्व सांगितले आणि त्यांना चांगलं शिक्षण देण्याचा संकल्पही केला. त्यांची सर्वात मोठी नात दिल्लीत शिकते. मुलांच्या शिक्षणावर खर्च करता येईल, एवढीही कमाई देसराज यांची नव्हती. त्यामुळे त्यांनी पूर्ण परिवाराला गावी पाठवलं. आणि राहिलेल्या सर्व नातवंडांची गावातील शाळेत रवानगी केली. देसराज यांची परिस्थिती आणि मुलांना शिकवण्याची धडपड पाहता शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलांची फी माफ केली. 

नातीला बनवायचं आहे शिक्षक
मोठ्या नातीनं इंटरमीडिएट परीक्षेत 80 टक्के गुण मिळवल्याने देसराज यांचा उर अभिमानाने भरून आला. नातीने दिल्लीच्या एका कॉलेजमधून बीएड करण्याची इच्छा व्यक्त केली. तिला त्या कॉलेजमध्ये पाठवण्याची देसराज यांची क्षमता नव्हती. त्यामुळे त्यांनी त्याचं घर एक लाख रुपयांना विकलं. आणि ते स्वत: रिक्षामध्ये राहू लागले. नातवंडांना शिकवण्यासाठी ते हा सर्व त्रास सहन करत आहेत. जेव्हा त्यांची नात वर्गात पहिली आल्याचे त्यांना समजले तेव्हा त्यांनी दिवसभर लोकांना फ्री राईड्स दिल्या होत्या. नातीनं शिक्षिका व्हावं अशी त्यांची इच्छा आहे.

लॉकडाउनचा बसला फटका
लॉकडाउनमुळे देसराज यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला होता. लॉकडाउन असतानाही ते रिक्षा चालवत होते. बऱ्याच कोरोना रुग्णांना त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेले होते. लॉकडाउन आधी ते दिवसाला 700-800 रुपये कमावत होते, पण सध्या त्यांना 300-400 रुपयेच मिळत आहेत. महिनाकाठी ते कसेबसे 10 हजार रुपये कमावत आहेत. त्यातील बराचसा हिस्सा ते आपल्या नातीला पाठवतात. तर उर्वरित हिस्सा हिमाचल प्रदेशमधील त्यांच्या कुटुंबाकडे पाठवतात. त्यांची पत्नाही गावात मिळेल ते काम करत आहे. 

फुटपाथवर राहणाऱ्या लोकांनाही करतात मदत
देसराज म्हणाले की, 1958मध्ये ते मुंबईत आले. मुंबईतच त्यांनी दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. 1985मध्ये त्यांनी रिक्षा चालवण्यास सुरवात केली. गेल्या वर्षभरापासून ते रिक्षातच झोपत आहेत, तसेच रिक्षातच बसून जेवणही करत आहेत. आर्थिक परिस्थिती ठीकठाक नसली तरी देसराज मनाने दिलदार आहेत. एखाद्या दिवशी जास्त गल्ला जमा झाला की फुटपाथवर राहणाऱ्या लोकांना मदत करतात. यामुळे अनेक ऑटोचालक त्यांचा आदर करतात.

क्राउड फंडिंगमधून मिळाले 24 लाख
ह्यूमन्स ऑफ बॉम्बेने सोशल मीडियात देसराज यांची गोष्ट शेअर केली. आणि त्यानंतर बऱ्याच लोकांनी त्यांना मदतीचा हात दिला. संस्थेनं 20 लाख रुपये मदतनिधी गोळा करण्याचं उद्दीष्ट ठेवलं होतं, पण देसराज यांना लोकांनी मोकळ्या मनाने मदतनिधी दिला होता. आणि या मदतनिधीतून त्यांना 24 लाख रुपये मिळाले. 

 - देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com