मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Mumbai PM Modi Event : संशयितांकडे बनावट सरकारी ओळखपत्र सापडलं असून त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीनं स्वतःला त्याचा बॉडीगार्ड असल्याचं सांगितलं आहे. त्याच्याकडेही बंदूकही आढळली आहे. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणात सतर्क झाली आहे.
Mumbai PM Modi Event

Mumbai PM Modi Event

esakal

Updated on

मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम आहे. अशातच BKC परिसरातील जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यातील मुख्य संशयितानं आपण PMOचा अधिकारी असल्याचं सांगितलं होतं. त्याच्याकडे बनावट सरकारी ओळखपत्र सापडलं असून त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीनं स्वतःला त्याचा बॉडीगार्ड असल्याचं सांगितलं. त्याच्याकडेही बंदूकही आढळली आहे. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणात सतर्क झाल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com