
Tahawwur Rana’s Big Revelation: मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाची एनआयएकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीत तहव्वुर राणाने मोठे खुलासे केले आहेत. त्यानं पाकिस्तानी लष्कराचं नाव घेतल्याचंही सांगण्यात येत आहे. एनआयएकडून अद्याप यावर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अलिकडेच तहव्वुर राणाचं अमेरिकेकडून प्रत्यार्पण झाल्यानंतर त्याला भारतात आणलं होतं. एनआयएच्या मुख्यालयातच त्याची चौकशी केली जात आहे.