
गँगरेप करून अल्पवयीन मुलीची हत्या; मृतदेहाशीही केलं दुष्कर्म
एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करून नंतर तिची निर्घृण हत्या केल्याची घटना राजस्थानमध्ये घडली होती. धक्कादायक म्हणजे मुलीचा श्वास थांबल्यानंतरही नराधमांनी मुलीच्या मृतदेहावर पुन्हा बलात्कार केला होती. मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना आता कायद्याने शिक्षा झाली आहे. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्हा पॉक्सो न्यायालयाने शुक्रवारी ऐतिहासिक निकाल देताना १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या दोन नराधामांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच दोन्ही आरोपींना 1 लाख 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. (Murder of a minor girl by gang rape; The court also sentenced the accused to death)
हेही वाचा: हुंडा न दिल्याने सासरच्यांकडूनच सामूहिक बलात्कार, नवऱ्यानेच शूट केला व्हिडीओ
न्यायमूर्ती बालकृष्ण मिश्रा यांनी आरोपींना शिक्षा सुनावली. या प्रकरणामध्ये एका अल्पवयीन आरोपीचाही सहभाग आहे, त्याचा खटला सध्या बाल न्यायालयात सुरू आहे तर आरोपी सुलतान भील आणि छोटू लाल यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
शवविच्छेदन अहवालात मृतदेहावर बलात्कार झाल्याचे उघड-
या आरोपींनी बलात्कार करून अल्पवयीन निर्घृण हत्या केली होती. शवविच्छेदन अहवालात आरोपींनी मृतदेहावरही बलात्कार केल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.
हेही वाचा: Tinder वर झाली ओळख, भेटीला बोलावून मुंबईत केला बलात्कार
पोलिसांनी 12 तासांत आरोपींना पकडले-
या घटनेची माहिती पोलिसांना 23 डिसेंबर 2021 रोजी मिळाली. ज्यामध्ये १५ वर्षीय मुलीची जंगलात हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. मुलीवर बलात्कार करून तिची गळा आवळून खून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले.
मुलीचे कपडे अस्ताव्यस्त पडले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नराधमांनी मुलीला दातांनी चावा घेतला, नखं उपटली आणि नंतर तिचा गळा दाबून खून केला. ही बाब समोर येताच पोलिसांनी 12 तासांत आरोपींना पकडले होते. पोलिसांनी 6 जानेवारी 2022 रोजी त्यांना न्यायालयात सादर केले होते.
Web Title: Murder Of A Minor Girl By Gangrape The Court Also Sentenced The Accused To Death
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..