विभक्त राहणाऱ्या महिलेने दिला लग्नास नकार; विवाहित प्रियकराने खून करून केली आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder of a woman for refusing to marry

महिलेने दिला लग्नास नकार; विवाहित प्रियकराने खून करून केली आत्महत्या

एका इसमाची पत्नी सोडून गेली. यामुळे त्याने महिलेला लग्नाची मागणी घातली. मात्र, तिनेही लग्नास नकार दिला. तिचे दुसऱ्यासोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय इसमाला आला. यातूनच त्याने महिलेवर गोळी झाडून हत्या (Murder) केली. यानंतर स्वतःवरही गोळी झाडली. छगन बंजारा (३०) व ममता (२३) असे मृतांची नावे आहेत. ही घटना राजस्थानमधील पाली येथे घडली. (Murder of a woman for refusing to marry)

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, छगन व ममता हे एकमेकांना पाच वर्षांपासून ओळखत होते. दोघेही एकच काम करीत होते. छगन विवाहित असून, दोन मुलं आहेत. छगनच्या त्रासाला कंटाळून पत्नी सोडून गेली. यादरमम्यान ममताला भेटल्यानंतर छगन तिच्या प्रेमात पडला. त्याला ममतासोबत लग्न करायचे होते. मात्र, ममता व तिच्या आईला हे मान्य नव्हते, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: अल्पवयीन मुलीवर बलात्कार; रक्तस्राव झाल्यानंतर घरातच मृत्यू

ममताचेही दोनदा लग्न झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. मात्र, दोन्ही पतींपासून विभक्त झाल्यानंतर ती आई-वडिलांसोबत राहत होती. छगनने लग्नाची मागणी घातल्यानंतर ती सतत नकार देत होती. छगनला ममताचे दुसऱ्या युवकासोबत प्रेमसंबंध (love affair) असल्याचा संशय होता. यामुळे त्याने ममताला अनेकदा ताकीदही दिली होती. तसेच लग्नाचा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी दबाव टाकत होता.

छगन रात्री नऊ वाजताच्या सुमारास सुभाषनगर येथील ममताच्या घरी आला. यावेळी ममता कुटुंबीयांसोबत जेवण करीत होती. छगनच्या हातात बंदूक पाहून ममताने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, छगनने तिला पकडले व गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने ममता तिथेच कोसळली. यानंतर छगनने स्वत:वरही गोळी (committed suicide) झाडली.

हेही वाचा: शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान; बिनविरोध निवड

दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी ममताला मृत (Murder) घोषित केले, तर छगनला जोधपूरला रेफर करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान छगनचाही मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली आहे. तसेच दोघांना अटक केली. दोघेही छगनला ममताच्या घरी घेऊन गेले होते.

Web Title: Murder Of A Woman For Refusing To Marry He Committed Suicide Crime News Rajasthan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top