Belgaum Crime : भररस्त्यात मोटारसायकल अडवून शिर धडावेगळं करून तरुणाचा निर्घृण खून; आरोपी फरार

शिवशंकर बेळगाव येथील रिलायन्स मॉलमध्ये दोन महिन्यांपासून कामाला होता.
Gokak Police Crime News
Gokak Police Crime Newsesakal
Summary

वडील शिवपुत्र शिवालिंग मुतनाळ यांनी गोकाक ग्रामीण पोलिसांत अज्ञातांविरोधात फिर्याद दिली.

गोकाक : येथून जवळच शिवापूर-सावळगी रस्त्यावर मोटारसायकल वरून घरी जाताना रात्री (ता. ९) नऊच्या सुमारास अज्ञातांनी मोटारसायकल अडवून तरुणाचा खून केला. शिवशंकर शिवपुत्र मगदूम (वय ३४, मुतनाळ-सावळगी) याचा मारेकऱ्यांनी गळा चिरून शिर धडावेगळे करून निर्घृण खून केला.

गोकाक ग्रामीण पोलिसांतून (Gokak Rural Police) व घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शिवशंकर बेळगाव येथील रिलायन्स मॉलमध्ये दोन महिन्यांपासून कामाला होता. काल सायंकाळी काम संपवून बेळगावहून रेल्वेने गोकाक येथे आला.

Gokak Police Crime News
धक्कादायक! पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय? चोरीच्या संशयातून पत्नीची भोंदूबुवासमोर विवस्त्र पूजा

रात्री सव्वाआठच्या सुमारास येऊन रेल्वे स्थानकासमोर लावलेली मोटारसायकल घेऊन मुतनाळला (सावळगी) आपल्या गावी जाताना शिवापूर-सावळगी रस्त्यालगत मड्डी शिवप्पन मंदिरासमोर रस्त्यावर काहीजणांनी त्याची मोटारसायकल अडवून ढकलून देऊन शिवशंकर यास पकडून याचे शिर धडावेगळे करून फरारी झाले.

Gokak Police Crime News
Karnataka NIA : बंगळुरात तब्बल 10 हजार बांगलादेशी बेकायदेशीर स्थायिक; NIA च्या तपासात धक्कादायक माहिती समोर

याबाबत त्याचे वडील शिवपुत्र शिवालिंग मुतनाळ यांनी गोकाक ग्रामीण पोलिसांत अज्ञातांविरोधात फिर्याद दिली. डीएसपी मुल्ला याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गोपाळ राठोड, उपनिरीक्षक किरण मोहिते अधिक तपास करीत आहेत. आज बेळगाव जिल्हा अतिरिक्त पोलिसप्रमुख वेणूगोपाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून गोकाक ग्रामीण पोलिसांना तपासाबाबत मार्गदर्शन केले. दरम्यान, या घटना घडून २४ तासानंतरही खुनाचे कारण पोलिसांना समजू शकलेले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com