मुरली मनोहर जोशींनी नोंदवला; बाबरी मशिद प्रकरणी जबाब 

Murli Manohar Joshi
Murli Manohar Joshi

लखनौ - बाबरी मशिद पतन प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री,भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचा आज सीबीआयच्या विशेष न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून जबाब नोंदवण्यात आला. यापूर्वी उमा भारती आणि कल्याण सिंह यांनी आपला जबाब नोंदवला आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायधीश एस.के. यादव यांनी मुरली मनोहर जोशी (वय ८६) आणि लालकृष्ण अडवानी (वय ९२) यांचा जबाब व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून नोंदवण्याचे निर्देश दिले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बाबरी मशिदप्रकरणी सीबीआय न्यायालय सध्या कलम ३१३ तंर्गत ३२ आरोपींचे जबाब नोंदवून घेत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दररोज सुनावणी घेतली जात असून ती ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. या महिन्यात भाजपच्या नेत्या उमा भारती व्यक्तिश: न्यायालयात हजर झाल्या होत्या. या वेळी भारती यांनी आपल्याला तत्कालीन कॉंग्रेस सरकारने या प्रकरणात राजकीय हेतूने अडकवल्याचा आरोप केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, दीर्घकाळापासून सुरू असलेल्या या खटल्याचा निकाल ३१ ऑगस्ट रोजी येण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायधीशांचा कालावधी देखील वाढवला आहे. या प्रकरणाचा निकाल दिल्यानंतरच न्यायधीश निवृत्त होतील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने निर्णयासाठी ३१ ऑगस्ट तारीख निश्‍चित केली आहे. तसेच शिवसेनेचे नेते सतीश प्रधान सध्या क्वारंटाइन असल्याने ते बुधवारी जबाबासाठी सीबीआयच्या न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. 

(Edited by : Kalyan Bhalerao)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com