
Jammu-Kashmir | जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या चकमकीत तीन दहशतवादी ठार
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu And Kashmir) अमरनाथ यात्रा मार्गावरील पहलगाममध्ये सुरक्षा दलांच्या गोळीबारात तीन दहशतवाद्यांची हत्या करण्यात आली आहे. पहलगाम हे अनंतनाग जिल्ह्यात येते. पोलिसांनी आजच्या कारवाईला मोठे यश असल्याचे म्हटले आहे.अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) मार्गावरील दहशतवादी हल्ल्यांची शक्यता यामुळे धुळीस मिळाली. या मारण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक हिज्बुल मुजाहिदीन दहशतवाद्याचा समावेश असल्याचे पोलिस म्हणाले. अश्रम मोलवी (हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवाद) यासह दोन इतर दहशवाद्यांची हत्या करण्यात आली. (Three Terrorists Killed In Security Forces Firing In Jammu And Kashmir)
हेही वाचा: कल्याण-डोंबिवलीतील मनसे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनात प्रवेश,एकनाथ शिंदे म्हणाले...
यात्रा मार्गावरील ही मोहिम आमच्यासाठी मोठे यश असल्याचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी ट्विट करुन सांगितले. पहलगामच्या जंगलात दहशवादी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाले. यावरुन सुरक्षा दलांनी शोध मोहिम सुरु केली, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा: सुरक्षा दलाने संकरित दहशतवादी पकडला; होता पाक दहशतवाद्यांच्या संपर्कात
लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यावर चकमक सुरु झाली. पहलगाम हे दक्षिण काश्मीरमधील टुरिस्ट रेसाॅर्ट आहे. हे एक अमरनाथ यात्रा बेस आहे. तब्बल दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर यात्रा येत्या ३० जूनपासून सुरु होणार आहे.
Web Title: Three Terrorists Killed In Security Forces Firing In Jammu And Kashmir
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..