esakal | 'सुई से डर नहीं लगता डॉक्टर'; लस घेताना हसणाऱ्या पोलिसाचा VIDEO तुफान व्हायरल

बोलून बातमी शोधा

corona_vaccination_Nagaland}

कोरोना प्रतिबंधात्मक केंद्रात अनेक मजेशीर किस्से घडत असल्याचे समोर येत आहे. सध्या सोशल मीडियात असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

'सुई से डर नहीं लगता डॉक्टर'; लस घेताना हसणाऱ्या पोलिसाचा VIDEO तुफान व्हायरल
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : जगभरात दहशत माजवणाऱ्या कोरोनाला आळा घालण्यासाठी आणि त्यापासून बचाव करण्यासाठी जवळपास सर्वच देशांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरवात झाली आहे. भारतातही कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहिम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. या दरम्यान ज्या काही घटना घडत आहेत, त्यांची सोशल मीडियात चर्चा होत आहे. सध्या असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला असून तुम्ही देखील पोट दुखेपर्यंत हसाल.  

मेडिकलला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; यंदा पदवीच्या जागा वाढणार!​

काही ठिकाणी लस टोचताना लोकांना रडू येत आहे, तर काहीजण घाबरलेले दिसतात. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील पोलिस कर्मचारी जोरजोरात हसताना दिसून येत आहे. आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

हा व्हिडिओ नागालँडमधील आहे. पोलिस कर्मचारी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी व्हॅक्सीन सेंटरवर पोहोचला, पण जेव्हा त्याला नर्सने स्पर्श केला तेव्हा तो जोरजोरात हसू लागला. त्याला हसताना पाहून तेथील उपस्थित सर्वांना आपले हसू आवरता आले नाही. 

US से आया हमारा दोस्त; टिकरी बॉर्डरवरील शेतकऱ्यांवर करतोय मोफत उपचार!​

व्हिडिओ शेअर करताना शर्मा म्हणतात की, 'नागालँडमधील कोविड-१९ लसीकरण केंद्रावरील हा व्हिडिओ. त्याने कोरोनाची लस टोचली की नाही माहित नाही, पण त्याला गुदगुल्या होत असल्याने तो घाबरल्याचे दिसून आले. कदाचित सुईमुळं नाही तर स्पर्शामुळे होणाऱ्या गुदगुल्यांमुळे त्याला हसू आलं असावं.'

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)