लस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा रोखणार पगार; नागपूर महापालिकेचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine

लस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा रोखणार पगार; नागपूर महापालिकेचा निर्णय

नागपूर : वारंवार लस घेण्याचं आवाहन करुनही त्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत नागपूर महापालिकेनं मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना लस घेण्याबाबत निर्वाणीचा इशारा देताना ज्या कर्मचाऱ्यांनी अद्याप लस घेतलेली नाही त्यांचे पगार रोखण्याची तयारी महापालिका प्रशासनानं केली आहे. यासाठी मार्गदर्शक सूचनाही जाहीर करण्यात आल्या आहेत.

नागपूर महापालिकेच्या आरोग्य अधिकारी भावना सोनकुसरे म्हणाल्या, ज्या कर्मचाऱ्यांनी अद्याप लस घेतलेली नाही त्यांचे पागर रोखण्याबाबत नागपूर महापालिकेनं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. कारण अजूनही अनेक कर्मचाऱ्यांचं लसीकरण बाकी आहे. पण आता ते लस घेण्यासाठी पुढे येत आहेत.

loading image
go to top