esakal | मोदींची जगनमोहन यांच्याशी दीड तास चर्चा; नितीशकुमारांनाही चुचकारणे सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

‘गोली मारो...’ची भाषा चुकीची - शहा 
दिल्लीतील पराभव हा ‘सीएए’च्या विरोधात नसल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीतील सभेत ‘भाजपविरोधकांना गोळ्या मारा’ असे बेताल वक्तव्य केले होते. त्यावर शहा यांनी, अशी वक्तव्ये चुकीची आहेत व ती करता कामा नयेत, अशा कानपिचक्‍या दिल्या आहेत. शहांनी आज ट्विटद्वारे सांगितले की, ‘‘निवडणुका या इतर पक्षांसाठी सरकार पाडणे किंवा बनविण्यासाठी जरूर असतात. पण, भाजप हा विशिष्ट विचारसरणीवर आधारित पक्ष असल्याने विजय-पराभवावर डोळा ठेवून आम्ही निवडणुका लढवीत नाही. प्रत्येक निवडणूक ही आमच्या विचारांत वृद्धी व्हावी म्हणूनच आम्ही लढतो.’

मोदींची जगनमोहन यांच्याशी दीड तास चर्चा; नितीशकुमारांनाही चुचकारणे सुरू

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - दिल्लीतील भाजपच्या दारुण पराभवानंतर राजधानीत, विशेषतः भाजपच्या गोटातील हालचालींना विलक्षण वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी दीर्घ चर्चा केली. दुसरीकडे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी गृहमंत्री अमित शहा हे सातत्याने संपर्कात असून, जागावाटपात त्यांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीच्या निकालानंतर व शिवसेना दूर गेलेली असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) परीघ विस्तारण्याबरोबरच विरोधकांना एकजूट होण्याची कोणतीही संधी न देण्याबाबत भाजप जागरूक झाल्याने संसद अधिवेशनाच्या उत्तरार्धाआधी मोदी मंत्रिमंडळाच्या संभाव्य पहिल्या विस्तारात मित्रपक्षांना भाजप झुकते माप देण्याची चिन्हे आहेत.

अमित शहांनी मान्य केली दिल्ली विधानसभा निवडणुकीतील चूक

बिहारमध्ये याच वर्षात विधानसभा निवडणूक आहे. दिल्लीच्या निकालानंतर तेथेच नव्हे, तर पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू व केरळसारख्या राज्यांतही भाजपची ‘बार्गेनिंग पॉवर’ कमी झाली आहे. साहजिकच, नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दलच नव्हे, तर कितीही कमकुवत असला तरी अण्णाद्रमुक यांच्याबरोबर जागावाटपात ‘सबुरीचे’ धोरण स्वीकारणे भाजपला भाग आहे.

आणखी वाचा - तीस हजारांच्या उधारीवरून झाला अपमान, संपूर्ण कुटुंबच संपवलं

या पार्श्‍वभूमीवर मोदी यांनी जगनमोहन रेड्डी यांची भेट घेऊन तब्बल दीड तास चर्चा केली. आंध्रात वायएसआर काँग्रेस-भाजप यांच्यात थेट युती होण्याची शक्‍यता जगनमोहन यांना परवडणारी नसली, तरी त्यांना लोकसभेत सहयोगी पक्ष म्हणून येण्यासाठी चुचकारण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत. जगनमोहन यांच्या खासदाराला लोकसभा उपाध्यक्षपद देण्याबाबत भाजपने विचारणा केली आहे. मात्र, जगनमोहन यांनी मोदींशी चर्चेनंतरही आपली ‘मन की बात’ भाजपला समजू दिलेली नाही.

Delhi Election : भाजपचा पराभव झाला असला तरी...

पासवान पिता-पुत्रांच्या लोकजनशक्ती पक्षासारख्या मित्रपक्षांनी केंद्रात योग्य प्रतिनिधित्व न मिळाल्याची तक्रार केली होती. बिहारमधील याच वर्षीची निवडणूक पाहता मोदी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत लवकरच निर्णय घेऊ शकतात, असे पक्षसूत्रांनी सांगितले. अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या उत्तरार्धाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार शक्‍य आहे. चिराग पासवान यांना केंद्रात मंत्रिपद देऊन प्रकृतिअस्वास्थ्याने ग्रस्त रामविलास पासवान यांना एनडीएचे संयोजकपद देण्याबाबतही चर्चा आहे. कमकुवत काँग्रेसऐवजी प्रादेशिक पक्षांची आघाडी होत गेली तर राज्याराज्यांत भाजपसमोर मोठी समस्या उद्‍भवू शकते. त्यामुळेच गैरभाजप पक्षांच्या प्रस्तावित आघाड्यांना रोखणे, हाही भाजपसमोरचा एक अजेंडा मानला जातो.