इंदापूर : छत्रपती कारखान्याचे ५ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप | Sugarcane Factory | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गाळप

इंदापूर : छत्रपती कारखान्याचे ५ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप

वालचंदनगर : भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने (Sugar Factory) चालू वर्षीच्या गळीत हंगामामध्ये ७३ दिवसामध्ये ५ लाख मेट्रीक टन उस गाळपाचा टप्पा पूर्ण केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी दिली.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २४ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरु झाला आहे. कारखान्याने ७३ दिवसामध्ये ५ लाख मेट्रीक टन उस गाळपाचा टप्पा पूर्ण केला असून ५ लाख ४ हजार क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. तसेच सहवीज निर्मिती प्रकल्पातून २ कोटी १९ लाख ९३ हजार युनिटची निर्मिती केली असून यातील १ कोटी ४६ लाख ३५ हजार युनिट महावितरणला निर्यात केली आहे.

हेही वाचा: हरप्रित चंडींनी घडवला इतिहास, उणे ५० अंश सेल्सिअस तापमानात ट्रेक पूर्ण

चालू वर्षीच्या साखरेच्या उताऱ्यामध्ये (रिकव्हरी) गेेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये वाढ होत आहे. छत्रपती कारखान्याच्या दोन्ही युनिटची गाळप क्षमता ६५०० मेट्रीक टन प्रतिदिन आहे. मात्र कारखाना सरासरी प्रतिदिन ८५०० मेट्रीक टन उसाचे गाळप करीत असून कारखान्याने एका दिवसामध्ये ९२२२ मेट्रीक टन उच्चांकी गाळप केले होते.

साखरेच्या उताऱ्यामध्ये होत आहेे वाढ...

गेल्यावर्षीच्या गळीत हंगामामध्ये जानेवारी महिन्यामध्ये साखरेचा उतारा १०.८६ होता.चालू गळीत हंगामामध्ये यामध्ये वाढ होवू लागली असून जानेवारीमध्ये साखरेचा उतारा ११.२३ मिळत आहेत. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जानेवारीच्या सरासरी साखरेच्या उताऱ्यामध्येही वाढ होत असून आत्तपर्यंत ०.३५ उतारा वाढला असून १०.५० वरती पोहचला आहे.

हेही वाचा: वीज वापराच्या नावाखाली 12 हजार कोटींचा भ्रष्टाचार : प्रताप होगाडे

सन २०१९-२० च्या गळीत हंगामामध्ये साखरेचा उतारा १०.४५ होता. सन २०२०-२१ च्या गळीत हंगामाध्ये साखरेचा उताऱ्यामध्ये ०.४५ टक्यांनी वाढ होवून १०.९० झाला.यामुळे २०२१-२२ ची च्या एफआरपी च्या रक्कमेमध्ये १२० रुपयांनी वाढ होवून २५१३ रुपये प्रतिटन झाली आहे. या गळीत हंगामामध्ये साखरेचा उतारा वाढत असल्याने पुढील वर्षाची एफआरपीच्या रक्कमेमध्ये वाढ होणार असल्याने सभासदांना वाढीव दर मिळण्याची अपेक्षा आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsSugar Factory
loading image
go to top