जगाला आणखी लस पुरवू - नरेंद्र मोदी

पीटीआय
Friday, 29 January 2021

आर्थिक आघाडीवर परिस्थिती वेगाने बदलत असून भारताच्या विकासाच्या प्रवासात इतर देशांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जगाला केले. तसेच, कोरोना लस आणखी मोठ्या प्रमाणात जगासाठी उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्‍वासनही मोदींनी दिले.

नवी दिल्ली - आर्थिक आघाडीवर परिस्थिती वेगाने बदलत असून भारताच्या विकासाच्या प्रवासात इतर देशांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जगाला केले. तसेच, कोरोना लस आणखी मोठ्या प्रमाणात जगासाठी उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्‍वासनही मोदींनी दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

जागतिक आर्थिक परिषदेच्या ऑनलाइन दावोस अजेंडा परिषदेत मोदींचे आज भाषण झाले. ते म्हणाले,‘‘ कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका भारताला बसेल आणि येथे संसर्गाची सुनामी येईल, असा अंदाज काही जणांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये व्यक्त केला होता. भारतात ७० कोटी लोक बाधित होतील आणि २० लाख लोक मृत्युमुखी पडतील, असे सांगण्यात आले होते. मात्र आम्ही कोरोनाविरोधातील लढाईला जनचळवळीचे रुप दिले आणि आज सर्वांत यशस्वीपणे लढा देणाऱ्या देशांमध्ये भारत आहे. आम्ही दोन लशींची निर्मिती केली असून ती अनेक देशांना दिली आहे. यापुढेही ती आणखी मोठ्या प्रमाणात देऊ.’’

राजदीप सरदेसाईंवर फेक न्यूज पसरवल्याचा ठपका; इंडिया टुडेमधून राजीनामा?

मोदींनी यानंतर भारताने राबविलेल्या मोहिमेची माहिती दिली. उद्योग जगताशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, पुढील औद्योगिक क्रांती ही मानवासाठी असेल, यंत्रमानवांसाठी नाही, हे कोरोना संसर्गाने जगाला शिकविले आहे. त्यामुळेच भारताने अनेक मोठ्या सुधारणा घडवून आणल्या असून आर्थिक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. जागतिक पुरवठा साखळी भक्कम करण्यासाठी भारत कटिबद्ध असून आत्मनिर्भर भारत त्यासाठी पूरक आहे, असा दावाही मोदींनी केला.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi to provide more vaccines to the world