Narendra Modi : 'मन की बात' कोट्यवधी भारतीयांच्या भावनांचे प्रकटीकरण; 100व्या भागात मोदींचं प्रतिपादन

Narendra Modi
Narendra Modi

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ' मन की बात' कार्यक्रमाचा १०० वा देशभरात प्रसिद्ध झाला. देशभरात अनेक ठिकाणी पंतप्रधान मोदींच्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आजच्या कार्यक्रमात मोदींनी 'मन की बात'चा प्रवास सांगितला. तसेच 'बेटी पढाओ बेटी बचाओ' अभियानाच्या यशावरही प्रकाश टाकला.

Narendra Modi
Apmc Election Result: अजित पवारांना धक्का! पुण्यात बंडखोरांकडून राष्ट्रवादीला 'दे धक्का'

मोदी म्हणाले की, देशभरात नारीशक्तीने अनेक अभियान राबवले आहेत. तसेच या महिलांविषयी मोदींनी काम सांगितलं. मोदींनी कार्यक्रमात अनेक व्यक्तींशी मन की बातमधून संवाद साधला. यावेळी त्यांनी पेन्सील स्लॅटचं काम करणारे काश्मीरचे मंजूर अहमद यांच्याशी संवाद साधला.

मोदींच्या मन की बात कार्यक्रमाचे मुंबईत आज खास आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. मुंबईसह उपनगरातील ३६ विधानसभेतील ५ हजाराहून अधिक ठिकाणी 'मन की बात' कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे,

Narendra Modi
Gas Leak: पंजाबमध्ये गॅस गळती दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू, 10 जणांची प्रकृती गंभीर

मोदी म्हणाले, मन की बात कोट्यवधी भारतीयांच्या भावनांचे प्रकटीकरण आहे. २०१४ मध्ये विजयादशमीच्या दिवशीपासून मन की बात कार्यक्रमाला सुरुवात झाली. हा कार्यक्रम देशातील चांगल्या गोष्टींचा आणि सकारात्मकतेचा अनोखा पर्व बनला आहे. हा कार्यक्रम दर महिन्याला येतो. या कार्यक्रमाचा सर्वांना प्रतीक्षा असते, असंही मोदी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com