Uttar Pradesh News : PM मोदी आणि CM योगी यांचे फोटो फेकले कचऱ्यात; सफाई कामगार निलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi and Yogi Adityanath Latest Marathi News

PM मोदी आणि CM योगी यांचे फोटो फेकले कचऱ्यात; सफाई कामगार निलंबित

मथुरा : मथुरा-वृंदावन महापालिका कार्यालयाजवळील सुभाष इंटर कॉलेजजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे फोटो कचऱ्यात फेकण्यात आले. शनिवारी (ता. १६) कचराकुंडीत हे चित्र टाकून नेण्यात येत होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महापालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली होती. याप्रकरणी कंत्राटी सफाई कामगाराची सेवा समाप्त करण्यात आली आहे. (Narendra Modi and Yogi Adityanath Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटी सफाई कामगार दुलीचंद हा कचरा गाडीत कचरा घेऊन जात होता. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे फोटो होते. येथून जात असलेल्या नागरिकांनी सफाई कामगाराला अडवले. नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे फोटो कचऱ्यात (garbage) पाहून वाद घालण्यास सुरुवात केली.

हेही वाचा: मला सिंगापूरला जाऊ द्या, मुख्यमंत्री केजरीवाल यांचं पंतप्रधानांना पत्र

सफाई कामगारांनी कचऱ्यातून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची छायाचित्रे काढली. मात्र, कार्यालयात ठेवण्याऐवजी कचऱ्याच्या ट्रॉलीत टाकल्याचे लोकांनी सांगितले. नागरिकांनी समजूत घातल्यानंतर सफाई कामगाराने कचरा गाडीतून छायाचित्रे काढली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाली.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चौकशी

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. कंत्राटी सफाई कामगारावर तातडीने कारवाई करून सेवा समाप्त करण्यात आली आहे, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त सतेंद्र तिवारी म्हणाले.

Web Title: Narendra Modi Yogi Adityanath Photo Thrown In Garbage Video Viral Uttar Pradesh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top