नताशा नरवाल, देवांगना कलिता यांची तिहार तुरुंगातून सुटका!

दिल्ली हायकोर्टानं १५ जून रोजी यांना जामीन मंजूर केला होता.
नताशा नरवाल-देवांगना कालिता
नताशा नरवाल-देवांगना कालिता

बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत (UAPA) गेल्या एक वर्षापासून तिहार तुरुंगात असलेल्या नताशा नरवाल आणि देवांगना कलिता यांची गुरुवारी सुटका करण्यात आली. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, दिल्ली हायकोर्टानं त्यांना नुकताच जामीन मंजूर केला होता. त्यामुळे हायकोर्टाच्या आदेशानंतर या विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली आहे.

दिल्ली हायकोर्टानं १५ जून रोजी या विद्यार्थ्यांचा जामीन मंजूर करताना म्हटलं होतं की, "असं वाटतंय की मतभेद दडपण्याच्या प्रयत्नात राज्यांच्या मनात निषेधाचा घटनात्मक अधिकार आणि दहशतवादी कारवाया यांची व्याख्या अस्पष्ट होत चालली आहे. जर असं मत तयार होत असेल तर हा लोकशाहीसाठी दुःखद दिवस असेल"

तिहार तुरुंगात झाली होती रवानगी

दरम्यान, नताशा नरवाल, देवांगना कलिता आणि आसिफ इक्बाल तान्हा यांना मे २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. ईशान्य दिल्लीत झालेल्या दंगलीच्या कट-कारस्थानात सहभागाचा त्यांच्यावर आरोप होता. त्यानंतर त्यांना UAPA अतर्गंत ताब्यात घेण्यात आलं होतं. दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे विद्यार्थी असलेले नरवाल आणि कलिता हे सध्या तिहार तुरुंगात आहेत. तर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचा विद्यार्थी तान्हा याला परीक्षेकरीता दोन आठवड्यांसाठी तात्पुरता जामीन देण्यात आला आहे.

अटी शर्तींवर दिला जामीन

या तिन्ही विद्यार्थ्यांना हायकोर्टानं प्रत्येकी ५०,००० रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर जामीन मंजुर केला. तसेच त्यांनी देश सोडून जाऊ नये, आपले मोबाईल क्रमांक त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडे नोंदवावेत तसेच त्यांच्यावरील खटल्यातील साक्षीदारांना भेटण्याचा किंवा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करु नये असंही दिल्ली हायकोर्टानं त्यांना जामीन देताना म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com