

Nathan Thomas Breaks 306 Year Old Record Becomes Worlds Youngest Engineering Professor at Age 18
sakal
मियामी : जगभरातील बहुतांश तरुण वयाच्या अठराव्या वर्षी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याच्या किंवा पहिल्या-दुसऱ्या सत्रामध्ये स्थिर होण्याच्या तयारीत असतात. मात्र, अमेरिकेतील फ्लोरिडाच्या नॅथन थॉमस या तरुणाने तब्बल ३०६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत प्राध्यापक होण्याचा मान मिळविला आहे. आज नॅथन फ्लोरिडाच्या प्रतिष्ठित मियामी डेड महाविद्यालयात अभियांत्रिकाचा प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवत आहे.