National Flag: घरी राष्ट्रध्वज फडकवण्याआधी जाणून घ्या 'हे' 10 नियम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

National Flag

National Flag: घरी राष्ट्रध्वज फडकवण्याआधी जाणून घ्या 'हे' 10 नियम

देश यावेळी 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. यावेळी देशाचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात. याशिवाय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व सरकारी संस्था, शाळा, महाविद्यालयांमध्ये तिरंगा फडकवण्यात येणार आहे. या स्वातंत्र्यदिनी प्रत्येक घरात तिरंग्या फडकवला जावा. नागरिकांनी हर घर तिरंगा या मोहिमेमध्ये समावेश करावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन आहे. देशासाठी हा अभिमानाचा क्षण असेल असेही ते म्हणलेत परंतु कायद्याच्या आधारे नागरिकांनी राष्ट्रध्वज कसा फडकावावा, याचे नियम ठरवून दिले आहेत, ज्याचे पालन करणे आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीने भारताचा राष्ट्रध्वज फडकवण्याच्या नियमांचे उल्लंघन केले तर त्याला तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.

26 जानेवारी 2002 रोजी भारतीय ध्वज संहितेत सुधारणा करण्यात आली, त्यानंतर कोणताही नागरिक आता कोणत्याही दिवशी त्यांच्या घर, कार्यालये आणि कारखान्यांवर तिरंगा फडकावू शकतो. नियमांनुसार तिरंगा नेहमी कापूस, सिल्क किंवा खादीचा असावा. त्याचा आकार नेहमी आयताकृती असावा, तर त्याची लांबी आणि रुंदी 3:2 च्या प्रमाणात असावी.

हेही वाचा: दिवसा- रात्री देखील तिरंगा फडकवता येणार; केंद्राकडून ध्वज संहितेमध्ये बदल

तिरंगा फडकवण्याचे नियम -

1. तिरंगा नेहमी सूर्योदय आणि सूर्यास्त या दरम्यान फडकवता येतो. यावेळी या नियमामद्धे सूट देण्यात आली आहे. या स्वातंत्र्यदिनी प्रत्येक घरात तिरंग्या फडकवला जावा आणि १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान फकवण्यात येणार आहे.

2. तिरंगा कधीही जमिनीवर ठेवता येत नाही.

3. ध्वज कधीही खाली केला जात नाही. सरकारी आदेशानंतरच सरकारी इमारतींवर झेंडा अर्ध्यावर फडकवता येईल.

4. ध्वज कधीही पाण्यात विसर्जित करता येत नाही.

5. ध्वजाचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.

हेही वाचा: National Flag: PM मोदींनी डीपीला लावला तिरंगा; जनतेलाही केलं आवाहन

6. ध्वजाचा कोणताही भाग जाळणे, खराब करणे किंवा अपमान करणे यासाठी तुरुंगवासाची शिक्षा आहे.

7. भारताच्या ध्वजाचा आकार आयताकृतीच असावा.

8. शहीद झालेल्या सशस्त्र दलाच्या जवानांव्यतिरिक्त इतर कोणत्याही मृत व्यक्तीच्या मृतदेहावर तिरंगा लावणे हा अपमान समजला जाईल..

10. तिरंगा कधीही फाटलेल्या किंवा घाणेरड्या पद्धतीने फडकावला जात नाही. ध्वज फाटला किंवा खराब झाला तर, एकांतात नष्ट करावा.

हेही वाचा: National Flag: तिरंग्या आधीचे ‘हे’ पाच राष्ट्रध्वज तुम्हाला माहिती आहेत का ?

Web Title: National Flag Know These 10 Rules Before Hoisting The National Flag At Home

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..