esakal | 'मी कुठल्याही बलिदानासाठी तयार' राजीनाम्यानंतर सिद्धूची पहिली प्रतिक्रिया | Navjot Singh Sidhu
sakal

बोलून बातमी शोधा

Navjot Singh Siddhu

'मी कुठल्याही बलिदानासाठी तयार' सिद्धूची पहिली प्रतिक्रिया

sakal_logo
By
दीनानाथ परब

चंदीगड: नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी काल तडकाफडकी काँग्रेस (congress) प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने पंजाबच्या (punjab) राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राजीनाम्यानंतर आज सिद्धू यांनी टि्वटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये सिद्धू यांनी सत्यासाठी लढत राहणार असल्याचं म्हटलं आहे.

'माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सत्यासाठी मी लढाई सुरु ठेवीन' असे सिद्धूने टि्वटरवर म्हटले आहे. "मी पंजाबच्या कल्याणासाठी लढतोय. त्याच्याशी मी अजिबात तडजोड करणार नाही. मी व्यक्तीगत अजेंड्यासाठी लढत नाहीय" असे सिद्धूने म्हटले आहे.

हेही वाचा: SBI बँकेत पदवीधरांसाठी बंपर भरती; 600 हून अधिक पदांवर मिळणार 'नोकरी'

"मी हाय कमांडची दिशाभूल करणार नाही. मी कुठल्याही बलिदानासाठी तयार आहे" असे सिद्धूने म्हटले आहे. पंजाब सरकारमधील नव्या नियुक्त्यांच्या मुद्यावरुन सिद्धूच्या मनात खदखद असल्याचे स्पष्ट झाले आहे. "कलंकित नेते आणि नोकरशहांनी आपण नवी व्यवस्था चालवू शकत नाही" असे सिद्धूने म्हटले आहे.

हेही वाचा: 'तुम्ही GST भरला का?'; स्पर्धकाच्या प्रश्नावर बिग बींची भन्नाट प्रतिक्रिया

सुनील जाखर यांनी सिद्धूला सुनावलं

'सिद्धू हे क्रिकेट नाहीय' अशा शब्दात सुनील जाखर यांनी सिद्धूंना सुनावले आहे. मंगळवारी केलेल्या टि्वटमध्ये सुनील जाखर यांनी सिद्धूवर विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. "या संपूर्ण प्रकरणात कशाशी तडजोड केली गेली असेल, तर तो विश्वास आहे, जो काँग्रेस नेतृत्वावने सिद्धूवर दाखवला होता" असे जाखर यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

loading image
go to top