सिद्धूंना भोवणार ३३ वर्षे जुने रोड रेज प्रकरण?

नवज्योतसिंग सिद्धू यांनी रोड रेज प्रकरणी पुनर्विचार याचिका फेटाळण्यात यावी,अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.
Navjot Singh Sidhu
Navjot Singh Sidhuटिम ई सकाळ

सध्या देशात पाच राज्याच्या निवडणुकीची (Election) रणधुमाळी सुरु आहे त्यात पंजाब(Panjab) मध्ये निवडणुकीची रंगत जोरदार पाहायला मिळत आहे.यातच काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना ३३ वर्षे जुने रोड रेज प्रकरण भोवण्याची शक्यता आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी रोड रेज प्रकरणी पुनर्विचार याचिका फेटाळण्यात यावी,अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.

“रोड रेज प्रकरणी पुनर्विचार याचिका फेटाळण्यात यावी.ही घटना ३३ वर्षांपूर्वी घडली होती त्यामुळे पुनर्विचार याचिका कायम ठेवणे योग्य नाही”असे सिद्धू म्हणाले.

Navjot Singh Sidhu
'जाधवांकडे बॅगा भरून पैसे आले होते, यासाठी मी वित्त मंत्र्यांना भेटलो'

काय आहे रोड रेज प्रकरण?

1988 मध्ये सिद्धू आणि त्यांचे सहकारी रुपिंदर सिंग संधू (Rupinder Singh Sandhu) हे पटियाला येथील शेरानवाला गेट क्रॉसिंगजवळ रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या जिप्सीमध्ये बसले होते, तेव्हा 65 वर्षीय गुरनाम सिंग या दोघांसोबत होते. ते बँके (Bank) कडे जात होते. पीडितेने दोघांना त्यांची कार क्रॉसिंगवरून काढण्यास सांगितले, ज्यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली. सिद्धूने केलेल्या मारहाणीत गुरनाम सिंग यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता. काँग्रेस नेत्याने मात्र सिंग यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा केला होता.

Navjot Singh Sidhu
'मुस्लिम लोक मानवतेचे शत्रू, त्यांचा मतदानाचा हक्क काढून घ्या'

सुरुवातीला हत्येचा आरोप असल्याने ट्रायल कोर्टाने सिद्धूची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर, हे प्रकरण पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात (Haryana High Court) पोहोचले. आणि तिथे सिद्धू आणि त्यांचे सहकारी रुपिंदर सिंग संधूना दोषी ठरवले आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात नवज्योतसिंग सिद्धूंना २०१८ मध्ये फक्त १००० च्या दंडासह सोडण्यात आले होते.

संबधीत व्यक्तीच्या कुटुंबाने कोर्टात जाऊन याचिका दाखल केली आणि कोर्टाने आपल्या निकालाचे पुनर्विचार करण्याची विनंती केली होती यावर आता नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुनर्विचार याचिका फेटाळण्यात यावी,असे म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com