सिद्धूंविरोधातील गटाची नाराजी पक्षश्रेष्ठींकडे

पंजाब काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या भूमिकेवरून चार मंत्री दिल्लीत हायकमांडकडे पोचले आहेत.
navjyotsingh siddhu
navjyotsingh siddhuSakal

चंडीगड : पंजाब काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या भूमिकेवरून चार मंत्री दिल्लीत हायकमांडकडे पोचले आहेत. उपमुख्यमंत्री सुखजिंदर रंधावा, भारतभूषण आशू, परगत सिंग, अमरिंदरसिंग राजा वडिंग यांचा समावेश आहे. त्यांनी पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली. हायकमांडने सिद्धूच्या बाजूने आणि विरोधात अशी दोन्ही मते जाणून घेतली. काँग्रेसच्याच नावावर विधानसभा निवडणूक लढली जाईल, असे रंधावा यांनी भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

नवज्योत सिंग सिद्धू हे प्रचारात स्वत:ला भावी मुख्यमंत्री म्हणून चेहरा आणत आहेत. त्यामुळे रंधावा यांनी पत्रकारांना स्पष्टीकरण दिले. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील काही नेते हायकमांड किंवा पक्षासमोर आपली भूमिका मांडण्याऐवजी थेट माध्यमासमोर आपले मत मांडत आहेत. या कृतीला हायकमांडने आक्षेप घेतला आहे. सुरवातीला मंत्री आशू यांनी सिद्धू यांच्याविरोधात मत मांडले होते. आता रंधावा देखील सिद्धूच्या वर्तनावरून नाराज झाले आहेत.

navjyotsingh siddhu
अर्थकारण समजल्याने विदर्भात कापसाचे भाव वधारले

त्यानंतर ते म्हणाले की, सध्या चन्नीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे. दुसऱ्या चेहऱ्याबाबत निवडणूक निकालानंतर विचार केला जाईल आणि त्यावर आमदार निर्णय घेतील. सिद्धूसाठी रंधावा यांनी गृहमंत्रालय सोडण्याबाबत मांडलेल्या प्रस्तावाची दखल हायकमांडने घेतली. अर्थात या नेत्यांनी सिद्धूंच्या वर्तनाबाबत तक्रार केली आणि सिद्धूंकडून सरकारवर सातत्याने टीका केल्याने निवडणुकीत त्याचा फटका बसेल, अशी भीती व्यक्त केली. यासंदर्भात हायकमांड सिद्धूंशी चर्चा करू शकते.

दिल्लीत भारतभूषण आशू, सुखजिंदर रंधावा यांनी सिद्धूविरोधात आघाडी उघडली आहे. त्यांच्या मते, सिद्धूचे काम हे काँग्रेस संस्कृतीला शोभणारे नाही. ते केवळ मी मी करतात. वास्तविक त्यांनी पक्षाचा विचार करायला हवा. रंधावा यांनी तर दोन दिवसांपूर्वी गृहमंत्रालय सोडण्याची तयारी केली होती. त्याचबरोबर अन्य मंत्री परगत सिंग आणि अमरिंदरसिंग राजा वडिंग हे सिद्धूंचे समर्थक मानले जातात. सिद्धूच्या विरोधात आणि बाजूने मत मांडण्यासाठी पंजाबमधील मंत्री दिल्लीत पोचले.

navjyotsingh siddhu
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून कोरोना नियमांची शहरात पायमल्ली

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा स्पष्ट नाही

पंजाबमध्ये एखाद्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून समोर आणल्यास गटबाजीचा धोका निर्माण होऊ शकते. परंतु सर्वात जास्त अडचण जातीय समीकरणाची आहे. सिद्धू हा पंजाबमध्ये लोकप्रिय चेहरा आहे. ते गर्दी देखील खेचतात. परंतु व्होटबँकेच्या गणितात चन्नींचे पारडे जड आहे. चन्नी हे अनुसूचित जातीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून काँग्रेस राज्यातील अनुसूचित जातीच्या ३२ टक्क्यांवर लक्ष ठेवून आहे. त्याचवेळी सुनील जाखड देखील हिंदूंचा मोठा चेहरा आहे.

या आधारे शहरातील सुमारे ३८ टक्के हिंदू मत अवलंबून आहेत. कॉंग्रेसकडून चन्नी, सिद्धू आणि जाखड हे तिन्ही चेहरे समोर आणण्याची तयारी आहे. परंतु सूत्राने दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसकडून एकच चेहरा येऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com