esakal | कोरोनामुळे अनाथ झालेल्यांना 'राष्ट्रवादी'चा आधार; सुप्रिया सुळेंनी केली घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

 Supriya sule

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही घोषणा करण्यात आली.

कोरोनामुळे अनाथ झालेल्यांना 'राष्ट्रवादी'चा आधार; सुप्रिया सुळेंनी केली घोषणा

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ भारतासह जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनामुळे जगातील 21 देशात आतापर्यंत जवळपास 15 लाख लहान मुले अनाथ झाली आहेत. याबाबतची माहिती द लँन्सेटमध्ये प्रकाशित झाली आहे. त्यानुसार, 15 लाखांहून अधिक मुलांनी कोरोनामुळे त्यांच्या आई वडिलांना गमावलं आहे. तर भारतात हीच संख्या 1 लाख 19 हजार इतकी आहे. आता अशा मुलांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक संकल्प जाहीर केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही घोषणा करण्यात आली. कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना मायेचा आधार राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या या उपक्रमाच्या माध्यमातून दिला जाणार आहे.

कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देत त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला. त्यासोबतच जवळच्या व्यक्तीचे प्रेम, आधार,पाठिंबा मिळावा यासाठी राष्ट्रवादी‌ जीवलग उपक्रमांतर्गत ४५० 'राष्ट्रवादी‌ सेवा‌दूत' या मुलांचे पालक बनणार असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

हेही वाचा: देशात ऑक्सिजनअभावी अनेकांचा मृत्यू; गडकरींचा VIDEO VIRAL

याबाबत त्यांनी एक पत्रही शेअर केलं आहे. त्यात म्हटलं आहे की, चिमुकल्या जिवांचं आभाळागत मायेचं छत्र कोरोनाने हिरावून घेतलं. या लहानग्यांसोबत कायमस्वरूपी आपुलकीचं नातं जोडण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने पुढाकार घेतलाय. त्यांना हक्काचे दादा-ताई, भाऊ-आक्का, काका-काकू, मामा-मामी, आत्ये तात्या बनण्यासाठी आणि त्यांचा विश्वासाचा माणूस म्हणून आपुलकीचं नातं जोडण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे युवक, युवती, विद्यार्थी यांतून निवडलेले जीवलग कार्यकर्ते पुढे येत आहेत. ते या मुलांच्या आयुष्यातील सच्चे भागीदार होतील. त्यांचे मित्र, साहाय्यक, मार्गदर्शकही होतील.

चाकोरी पलीकडे जाऊन या मुलांना सावरण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे हे जीव आपुलकीने प्रयत्न करतील. त्यांना कोमेजू न देता, त्यांनी आयुष्य पुन्हा स्वच्छंदी पाखराप्रमाणे जगावं यासाठी समरसून प्रयत्न करतील असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: भारतात कोरोनामुळे 'इतक्या' मुलांनी आई-वडिलांना गमावलं!

अनाथपण विसरून ही मुलं या जीवलगांकडे हक्कानं व्यक्त होतील. हट्ट धरतील, रडतील, खेळतील. या मुलांच्या सातत्याने भेटी होतील. त्यातूनच आधाराचा आश्वासक हात घट्ट होत जाईल. त्यांच्या अडचणींच्या काळात, सुखदुःखात हक्काचं मायेचं छत्र राष्ट्रवादीचे जीवलग बहाल करतील असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

loading image