esakal | देशात ऑक्सिजनअभावी अनेकांचा मृत्यू; गडकरींचा VIDEO VIRAL
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व्हायरल व्हिडिओमध्ये देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूबद्दल बोलताना दिसतात.

देशात ऑक्सिजनअभावी अनेकांचा मृत्यू; गडकरींचा VIDEO VIRAL

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासला होता. ऑक्सिजनसाठी राज्यांकडून केंद्राकडे सतत मागणी केली जात होती. दरम्यान, या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी कोणाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनात दिली. त्यानंतर केंद्र सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व्हायरल व्हिडिओमध्ये देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूबद्दल बोलताना दिसतात. ऑक्सिजन प्लांटच्या पायाभरणीच्या समारंभात 9 जून रोजी गडकरी बोलत होते. त्यात ते म्हणतात की,'कोरोनाच्या काळात देशातील अनेक लोकांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे प्राण गमवावे लागले.' गडकरींचा हा व्हिडिओ शेअर करून विरोधकांनीसुद्धा केंद्र सरकारवर टीका केली आहे.

हेही वाचा: भारतात कोरोनामुळे 'इतक्या' मुलांनी आई-वडिलांना गमावलं!

दरम्यान, केंद्र सरकारने सभागृहात माहिती देताना म्हटलं की, आम्हाला राज्यांनी आणि केंद्र शासित प्रदेशांनीच आकडेवारी दिली आहे. त्या आकडेवारीत ऑक्सिजनमुळे मृत्यू झाल्याची कोणतीच नोंद नाही. आरोग्य हा राज्य सरकारच्या अखत्यारित असलेला विषय असल्याचंही केंद्राने सभागृहात सांगितलं होतं.

हेही वाचा: वाद शिगेला! सिद्धूच्या जाहीर माफीसाठी अमरिंदर सिंग बसले अडून

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मृत्यूची नोंद करण्यासाठीची मार्गदर्शक सूचना दिली होती. त्यानुसार राज्यांकडून आणि केंद्रशासित प्रदेशांकडून प्रत्येक दिवशी आकडेवारी दिली जाते. आतापर्यंत यामध्ये ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची आकडेवारी कोणत्याच राज्याने दिलेली नाही अशी माहिती अधिवेशनात देण्यात आली.

loading image