शरद पवार-नरेंद्र मोदींची दिल्लीत होणार भेट; काय असेल?

वृत्तसंस्था
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

मोदी आणि पवार यांची आज दुपारी साडेबारा वाजता लोकसभेत भेट होणार आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये मंगळवारीच भेट होणार होती. पण, ती होऊ न शकल्याने आज ही भेट होणार आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतच राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक केल्यानंतर आणि महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नसताना आज (बुधवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मोदींची भेट घेणार आहेत. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

मोदी आणि पवार यांची आज दुपारी साडेबारा वाजता लोकसभेत भेट होणार आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये मंगळवारीच भेट होणार होती. पण, ती होऊ न शकल्याने आज ही भेट होणार आहे. पवार यांनी अद्याप राज्यातील सत्ता स्थापनेचे पत्ते उघड केलेले नाहीत. तसेस त्यांनी ज्यांना सर्वाधिक जागा आहेत आणि जे युतीत लढले आहेत, त्यांना सत्ता स्थापनेबाबत विचारा असे म्हटले होते. त्यामुळे अजून कोणत्याही आघाडीवर शिक्कामोर्तब झाले नसल्याचे स्पष्ट आहे. महाराष्ट्रात ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भेटीत याच मुद्द्यावर जास्त भर असेल असे सांगण्यात येत आहे. केंद्राकडून राज्यातील शेतकऱ्यांना मदत अपेक्षित आहे.

सरकार अस्तित्वात येण्याची चिन्हे; आज काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक 

सोमवारी मोदींनी राज्यसभेत भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमच्या पक्षासह सर्वांनी शिकण्याची गरज असल्याचे म्हटले होते. तसेच मोदी हे कायमच पवार हे माझे गुरु असल्याचे म्हणत आलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये आज होणाऱ्या बैठकीकडे अनेक अर्थाने पाहिले जात आहे. महाराष्ट्रात भाजपला 105 जागा मिळूनही शिवसेना सोबत नसल्याने सत्ता स्थापन करता आलेली नाही. तर, दुसरीकडे शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे आजच्या या दोघांच्या बैठकीला महत्त्व आले आहे.

संजय राऊतांना आज आठवली वाजपेयींची कविता; काय आहे पाहा...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar meets PM Narendra Modi in Delhi