Bihar Politics : राजकीय घडामोडींमध्ये पवारांचं मोठं विधान; म्हणाले, ''नितीश कुमार...''

Sharad Pawar latest marathi news
Sharad Pawar latest marathi newsesakal

Shrad Pawar On Bihar Political Crises : एकीकडे महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार होत असाताना दुसरीकडे भाजपला बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपसोबत असलेली युती तोडून मोठा धक्का दिला आहे त्यामुळे अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या सर्वामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केले आहे. भाजप त्यांच्या मित्र पक्षाला हळूहळू संपवतो असं वक्यव्य शरद पवार यांनी केले आहे. शिवसेना आणि जेडीयूकडे बोट दाखवत पवारांनी एकप्रकारे भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Sharad Pawar latest marathi news
Sharad Pawar : मित्र पक्षांवरील शरद पवारांच्या आरोपांवर फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले...

पवार म्हणाले की, वेळीच सावध होत नितीश कुमारांनी शहाणपणाचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेवरही भाजपाने आघात केला. भाजपा मित्रपक्षांना दगा देतं हीच नितीश कुमारांची देखील तक्रार होती. नितीश कुमार यांनी भाजपसोबत घेतलेल्या फारकतीवर पवारांनी वरील वक्तव्य केलं आहे. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचचं असून शिंदे गटाचं नाही असेही पवारांनी स्पष्ट केले आहे.

Sharad Pawar latest marathi news
हे धोका देणाऱ्यांच राज्य आहे, असं म्हणणाऱ्या बच्चू कडूंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

जनता धडा शिकवेल

नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा (Resignation) दिल्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘असे करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल असे म्हणत आम्ही २०२०च्या विधानसभा निवडणुका एनडीएअंतर्गत एकत्र लढल्या होत्या. जनादेश जेडीयू आणि भाजपसोबत (BJP) होता. आम्ही जास्त जागा जिंकल्यानंतरही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले. आज जे काही झाले ते बिहारच्या जनतेशी व भाजपशी विश्वासघात आहे, असे पत्रकार परिषदेत बिहार भाजपचे प्रमुख संजय जयस्वाल यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar latest marathi news
Maharashtra : CM शिंदेंची शक्ती जास्त की सत्तारांची? शपथविधीनंतर नव्या वादाला सुरुवात

2022 च्या बिहार (Bihar) विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयूने 243 जागांपैकी 45 जागा जिंकल्या. तर भाजपला 77 जागा मिळाल्या होत्या. जेडीयूने कमी जागा जिंकूनही भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवून राज्याची कमान त्यांच्याकडे सोपवली होती. बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने 79 जागा आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 19 जागा जिंकल्या. तर हमला 4 जागा मिळाल्या. बहुमताचा आकडा 122 आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com