
Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटामद्धे नाराजीचे सुर उमटलेले पाहायला मिळाले. चर्चेत असलेले आमदार कॅबिनेट पदावर बसले. तर बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा राजकारणाच्या वर्तुळात रंगू लागली अशातच बच्चू कडू आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेले होते.मंत्रिमंडळ विस्तारामद्धे अपक्ष उमेदवारांना संधी मिळाली नसल्याच बोललं जात आहे. त्यात बच्चू कडू यांचाही समावेश आहे, याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी नंदनवन या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.
काल प्रतिक्रिया देताना बच्चू कडू यांनी म्हंटल होत की, लवकरच म्हणजेच सप्टेंबर मध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा अर्थातच प्रहरलाही संधी देण्यात येईल.
बच्चू कडू यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की , सगळ्यातच थोडी नाराजी असते. तशी माझ्यातही आहे. पण इतकी जास्तही नाही की,गटाला सोडून दुसऱ्या गटात जाईल अशी नाराजी नाही. ही क्षणिक नाराजी आहे. अजून पुढील विस्तार बाकी आहे. जर मंत्रिमंडळाचा सगळा विस्तार झाला असता आणि अशी परिस्थिति असती तर गोष्ट वेगळी असती. मी फक्त मंत्रीपदासाठी त्याच्यासोबत नाही. आम्ही काही मुद्यांमुळे त्यांना सपोर्ट केला आहे. जर ते म्हणाले असते की आम्ही पद देऊ शकत नाही तर गोष्ट वेगळी असती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल होत मंत्रिपद देऊ बघू आता पहिल्या यादीत नाही दिलं पण दुसऱ्या यादीत बघूया. मला मंत्रिपदासाठी थांबवले म्हणजे कायमचं थांबवलं नाही, काही दिवसासाठी थांबवलं आहे. एकत्र राहायचं म्हणजे समजून घ्यावे लागणार.'
काही अडचणी वरिष्ठांना असतील तर आपण समजदारी घेतली पाहिजे. मला शब्द दिला होता, ते करतो म्हणले होते. मंत्रीपद देतो म्हणून हा शब्द मला दिला होता. हा शब्द जरी पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात पाळला गेला नाही तरी मला विश्वास आहे दुसऱ्या वेळेस जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा मंत्रीपद मिळेल, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे
मंत्रिमंडळाचा विस्तारावर "हे राजकारण आहे इथं 2 अधिक 2 4 ही होत आणि शून्य पण होऊ शकत त्यामुळं काय होईल सांगता येत नाही" असंही कडू म्हणालेत.