NCP supports BJP : नागालँडमध्ये राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा, सोशल मीडियावर पत्र व्हायरल!

NCP supports BJP
NCP supports BJP

नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार निवडून आलेले आहेत. या निकालानंतर राष्ट्रवादी हा नागालँडमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. नुकताच नागालँड सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. विरोधक नसलेले सरकार सत्तेत बसले आहे. भाजप आणि एनडीपीपी यांनी सोबत सरकार स्थापन झाले आहे. काल ९ आमदांनी मंत्री म्हणून शपथ देखील घेतली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रसेने नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा दिला असून याबाबत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नरेंद्र वर्मा यांनी पत्र दिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी विरोधात बसणार की सत्तेत सहभागी होणार याची चर्चा रंगली होती. मात्र राष्ट्रवादीने नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा दिला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नरेंद्र वर्मा यांनी माहिती दिली आहे. तसे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मात्र याबाबत शरद पवार किंवा NCP च्या अधीकृत अकाऊंटवरून माहिती मिळाली नाही. त्यामुळे आम्ही या पत्राची पुष्टी करत नाही.

नागालँडमध्ये येथील आमदारांनी भाजपसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय प्रवक्ते नरेंद्र वर्मा यांनी आज पत्राव्दारे दिलेल्या माहितीनुसार ४ मार्च रोजी नागालँडची राजधानी कोहिमा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची पहिली बैठक झाली. त्या बैठकीत राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी कोण होणार यावर चर्चा झाली, उपनेते, मुख्य व्हीप, व्हीप आणि प्रवक्ता ठरवण्यात आले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेले पत्र
सोशल मीडियावर व्हायरल झालेले पत्र
NCP supports BJP
BJP leaders Quit Party: भाजपच्या आयटी सेलमधील 13 नेत्यांचा पक्षाला रामराम!

राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते एर. पिक्टो शोहे, पी. लॉन्गॉन, नम्री नचांग हे असतील तर विधिमंडळ पक्षाचे प्रमुख व्हीप नेते म्हनबेमो हमत्सो हे असतील. तसेत व्हीप एस. तोइहो येप्थो हे असतील.

राष्ट्रवादी काँग्रेस सरकारचा भाग होणार की प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावणार याबाबतही चर्चा झाली. स्थानिक नवनिर्वाचित आमदार आणि नागालँडच्या NCP स्थानिक युनिटचे असे मत होते की आपण सरकारचा भाग असायला हवे. ज्याचे नेतृत्व (NDPP) राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे प्रमुख आणि नागालँडचे मुख्यमंत्री श्री. एन. रिओ यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. नागालँड राज्याच्या व्यापक हितासाठी आणि एन. रिओसोबतचे आमचे चांगले संबंध चांगले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नागालँड सरकारचा भाग व्हावे की नाही याबाबत आज निर्णय घेतला आहे. मंगळवारी सकाळी ईशान्य प्रभारींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी नागालँड राज्याच्या व्यापक हितासाठी नागालँडचे मुख्यमंत्री एन. रिओ यांचे नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळाची प्रस्तावित यादीही मंजूर केली, अशी माहिती नरेंद्र वर्मा यांनी दिली आहे.

NCP supports BJP
Politics: सत्ताधारी धुळवड खेळण्यात दंग, सभागृहात विरोधक संतापले! फडणवीस म्हणाले, "बोलायला लावू नका"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com