‘एनडीआरएफ’ला लवकरच जागतिक मानांकन शक्य

पीटीआय
Monday, 11 January 2021

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला (एनडीआरएफ) या वर्षाच्या अखेरीपर्यंत जागतिक मानांकन मिळण्याची शक्यता असल्याने भारत हा लवकरच संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय बचाव मोहिमांचा हिस्सा बनू शकतो, असे ‘एनडीआरएफ’चे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

नवी दिल्ली - राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला (एनडीआरएफ) या वर्षाच्या अखेरीपर्यंत जागतिक मानांकन मिळण्याची शक्यता असल्याने भारत हा लवकरच संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय बचाव मोहिमांचा हिस्सा बनू शकतो, असे ‘एनडीआरएफ’चे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे आंतरराष्ट्रीय मानांकन ‘इन्सारॅग’ या संस्थेतर्फे केले जाते. स्वित्झर्लंड येथे मुख्यालय असलेल्या या संस्थेचे ९० हून अधिक देश आणि संयुक्त राष्ट्रांच्या विविध संघटनांमध्ये जाळे असून ते जगभरात शोध आणि बचाव मोहिमा राबवितात. ‘भारतात ज्याप्रमाणे मानांकन पद्धत आहे, त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रांच्या ‘इन्सारॅग’मार्फत जगभरातील आपत्ती निवारण पथकांना मानांनक दिले जाते. हे आंतरराष्ट्रीय मानांकन असते. हे मानांकन मिळविण्याच्या आम्ही फारच जवळच असून कदाचित या वर्षी ते मिळेल, अशी आशा आहे,’ असे प्रधान म्हणाले. हे मानांकन चीन आणि पाकिस्तानमधील संस्थांनाही मिळाले आहे. एखाद्या नैसर्गिक आपत्तीमध्ये संयुक्त राष्ट्रांना मदतीची अपेक्षा असल्यास ते तुम्हाला तशी हाक देऊ शकतात, तुम्ही आंतरराष्ट्रीय पथकामध्ये सामील होता, असे प्रधान यांनी सांगितले.  

सुसाइड नोट लिहित तरुणीनं घेतला गळफास; आरोपीवर 'लव्ह जिहाद'चा आरोप

‘एनडीआरएफ’ने याआधीही इतर देशांमधील बचाव मोहिमांमध्ये भाग घेतला होता. नेपाळ आणि जपानमध्ये या दलाने कार्य केले आहे. मात्र, ही त्या देशांनी वैयक्तिकरित्या केलेली विनंती होती. ‘यूएन’चे मानांकन मिळाल्यास ‘एनडीआरएफ’चे नाव बचाव पथकांच्या जागतिक यादीत येणार आहे. ‘इन्सारॅग’च्या समितीने सप्टेंबर २०१९ मध्ये ‘एनडीआरएफ’च्या कार्याचा प्राथमिक आढावा घेतला आहे. कोरोना परिस्थितीमुळे या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. मात्र, २०२१ या वर्षांत ‘एनडीआरएफ’च्या दोन मोठ्या पथकांना मानांकन मिळेल, अशी आशा प्रधान यांनी व्यक्त केली.

प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणा मिळाला? भारतीय वंशाच्या राष्ट्राध्यक्षांना मिळणार मान 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NDRF could soon be globally ranked